घरताज्या घडामोडीकोरोनामुळे कपलमधील ब्रेकअप-घटस्फोट होण्याच्या प्रमाणात वाढ!

कोरोनामुळे कपलमधील ब्रेकअप-घटस्फोट होण्याच्या प्रमाणात वाढ!

Subscribe

जगभरात कोरोना प्रादुर्भाव वाढायला लागल्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन जाहीर झाला. आता हेच कारण कपलमधील ब्रेकअप आणि घटस्फोटचे ठरले आहे. कोरोना महामारीमुळे ब्रिटनसह जगात ब्रेकअप आणि घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान कोरोनामुळे ब्रेकअप आणि घटस्फोट होण्याचे प्रमाण आणखीन वाढणार असून शिगेला पोहोचणे अजून बाकी आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय महिला सोफी टर्नर आणि तिचा पती या दोघांनी घटस्फोटाचा अर्ज केला आहे. कोरोना काळापूर्वी दोघांनी कधीची वेगळे होण्याबाबत चर्चा केली नव्हती. पण कोरोना काळादरम्यान सोफी खूप तणावात राहू लागली आणि तिचे लग्न मोडले.

- Advertisement -

एका अमेरिकाच्या लॉ फर्मचे म्हणणे आहे की, ‘घटस्फोट करारच्या विक्रीत ३४ टक्के वाढ झाली आहे. कोरोनामुळे घटस्फोट वाढल्याचे प्रमाण चीनमध्ये दिसत आहे. स्वीडनमध्ये देखील अशीच स्थिती आहे.’ तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘कोरोनामुळे अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले असून लोकं मानसिक समस्यांचा सामना करत आहेत. या कारणांमुळे सध्या ब्रेकअपची प्रकरणे वाढली आहेत.’

कोरोना महामारीमुळे तणाव निर्माण झाला असून लोकांना आपल्या राहणीमानात बदल करावा लागत आहे, असे तज्ज्ञ म्हणाले आहेत. तसेच लॉ फार्ममध्ये काम करणाऱ्या कार्ली किंच म्हणतात की, ‘कोरोना महामारी कपलमध्ये तुफान घेऊन आली आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे कपलला अधिक काळ एकत्र घालवायला लागत असून काही कपलचे यामुळे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ब्रेकअपनंतरच मुली बलात्काराची तक्रार करतात’, महिला आयोग अध्यक्षांचं वक्तव्य!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -