घरट्रेंडिंगओडिशातील तो करोनाबाधीत रूग्ण १२९ लोकांच्या संपर्कात आला

ओडिशातील तो करोनाबाधीत रूग्ण १२९ लोकांच्या संपर्कात आला

Subscribe

ही व्यक्ती १० दिवसांपूर्वी इटलीहून भारतात आली होती.

ओडिशामध्ये करोनाची लागण झालेला पहिला रूग्ण सापडला आहे. पण या रूग्णामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. कारण हा रूग्ण १२९ जाणांच्या संपर्कात आला आहे. ही व्यक्ती १० दिवसांपूर्वी इटलीहून भारतात आली होती. सध्या चीननंतर इटलीमध्ये सर्वाधीक करोनाचे रूग्ण आहेत. इटलीहून परतलेल्या या व्यक्तीने विलगीकरणापासून वाचवण्यासाठी अनेकदा गेस्ट होऊस बदलल्याचं समजत आहे.

हा व्यक्ती भुवनेश्र्वरला परत येईपर्यंत १२९ लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ओडिशात खळबळ उडाली आहे. या ३३ वर्षीय व्यक्तीवर सध्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहेत. तो व्यक्ती १२९ लोकांच्या संपर्कात आलेल्या ७९ जण राजधानी एक्सप्रेसमधील त्याचे सहप्रवासी होते. ६ मार्चला ही व्यक्ती इटलीहून दिल्लीत पोहचला होता. मात्र दिल्लीत तीथे करण्यात आलेल्या स्क्रिनिंगमध्ये करोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती.

- Advertisement -

डॉक्टरांनी दिलेला घरी राहण्याचा सल्ला

करोनाची लक्षण आढळली नसली तरी त्याला १४ दिवस घरात एकटं राहण्याचा सल्ला दिला होता. त्याने कोणाच्या संपर्कात येऊ नये अशी सुचनाही त्याला देण्यात आली होती. पण तरीही त्याने भुवनेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ११ मार्चला दिल्लीमधील गेस्ट हाऊस आणि नंतर इतर गेस्ट हाऊसमध्ये तो रहात होता. त्यानंतर त्याचे वडील त्याला घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. रिक्षातून त्याला ते घरी घेऊन गेले. १३ मार्च रोजी तपासणीसाठी तो कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पोहोचला. रविवारी त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -