घरCORONA UPDATEभारतात २४ तासांत ५,२०० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण १ लाख ६ हजार

भारतात २४ तासांत ५,२०० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण १ लाख ६ हजार

Subscribe

भारतात आतापर्यंतची २४ तासांतली सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद काल झाली आहे. काल एका दिवसांत तब्बल ५,२०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकूण आकडा आता १ लाख ६ हजार ४७५ पर्यंत पोहोचला आहे. यात महाराष्ट्राच्या दोन हजाराहून अधिक रुग्णांचा समावेश तर आहेच, त्याशिवाय इतर चार राज्यांतूनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला दिसला. तसेच मृत्यूच्या आकड्यानेही चांगलीच उसळी घेतली आहे, मंगळवारी देशभरात १४६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

महाराष्ट्रात काल ७६ रुग्णांचा मृत्यू झाला, यापैकी एकट्या मुंबईतले ४३ रुग्ण होते. तर महाराष्ट्रा नंतर गुजरातचा नंबर असून तिथे २५ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राने सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिका रुग्णांची नोंद केली. तर मुंबईत देखील आता एक हजाराहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळत आहेत.

- Advertisement -

इतर राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रा नंतर रुग्णसंख्येच्या वाढीत तामिळनाडू आहे. तामिळनाडूमध्ये मंगळवारी ६८८ रुग्णांची नोंद झाली. त्यांनतर दिल्ली ५००, गुजरात ३९५, राजस्थान ३३८, उत्तर प्रदेश २९२, कर्नाटक १४९ आणि मध्य प्रदेश १३९ तर उर्वरीत भारतात ७३३ रुग्णांची नोंद झाली.

उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजूर परतण्यास सुरुवात झाली आहे. या मजुरांकडून होत असलेल्या संसर्गात ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात मंगळवारी ४४ पॉझिटिव्ह केस आढळल्या. जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी तपास केल्यानंतर हे सर्व रुग्ण महाराष्ट्रातून परतलेले स्थलांतरीत कामगार असल्याचे समजले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४,९४१ असून मृतांचा आकडा १२३ आहे.

- Advertisement -

राजस्थानमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी ३०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी राज्यात ३०५ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात वाढ होऊन ३३८ रुग्ण आढळून आले. राजस्थानची एकूण रुग्णसंख्या आता ५,८४५ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १४३ वर आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्रानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये एकूण रुग्णसंख्या १२,१४१ असून मृतांची संख्या ७१९ आहे. आतापर्यंत ५,०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -