CoronaVirus: भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी

भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाची परवानगी

Remedesivir

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. मात्र, ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान, आता या औषधाचं उत्पादन भारतात होणार आहे. यासह या औषधाची विक्रीही करता येणार आहे. भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन भारतात होणार असून भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दरम्यान, रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवं होतं. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही आयात थांबवण्यात आली आहे. मात्र, आता भारतातच उत्पादन होणार असल्याने कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी आहे.


हेही वाचा – चीनला उत्तर देण्यास तयार राहा, संरक्षणमंत्र्यांचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश


ज्यांना कोरोनाची लागण झाली असून जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत केवळ त्यांच्यासाठीच रेमडेसिवीर हे औषध वापरण्यात येणार आहे. यासाठी या औषधाचं उत्पादन आणि विक्रीसाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी औषधी महानियंत्रक विभागानं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं सांगितलं आहे.