घरदेश-विदेशदिलासादायक! कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी

दिलासादायक! कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी

Subscribe

आतापर्यंत भारतात ३८ लाख ५९ हजार ३९९ जणांनी जीवघेण्या कोरोनाला हरवून ते बरे झाले आहेत.

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोना विषाणूच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांमध्ये भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत भारताने ब्राझीलला मागे टाकत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात ३८ लाख ५९ हजार ३९९ जणांनी जीवघेण्या कोरोनाला हरवून ते बरे झाले आहेत.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, ब्राझीलमध्ये ३७ लाख २३ हजार २०६ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर ब्राझील दुसर्‍या स्थानावर असून अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत २४ लाख ५१ हजारांहून अधिक कोरोना बाधित झाल्यानंतर उपचार झाल्यावर बरे झाले आहेत. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना ही दिलासादायक बातमी समोर आली आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत जगात २ कोटी ९१ लाखांहून अधिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारानंतर १ कोटी ९७ लाखांहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तर जगभरातील कोरोनामुळे आतापर्यंत ९ लाख २७ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत भारतात कोरोनामुळे ८० हजार ७७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत हजाराहून अधिक लोकांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.


भारतात तीन कोरोना लसी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या टप्प्यात; ICMR ने दिली माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -