घरदेश-विदेशकोरोनाच्या लढाईत रेमडेसिवीर किती प्रभावी? तज्ज्ञांचा सल्ला वाचा

कोरोनाच्या लढाईत रेमडेसिवीर किती प्रभावी? तज्ज्ञांचा सल्ला वाचा

Subscribe

देशात कोरोनाचा पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनाशी संबंधित इंजेक्शन आणि औषधांची काळाबाजारी होत आहे. तसंच, मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची मागणी वाढू लागली आहे. मात्र हे इंजेक्शन खरंच प्रभावी आहे का?, याची माहिती AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन फार प्रभावी नसल्याचं गुलेरिया यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत रेमडेसिवीर हे इंजेक्शन फार प्रभावी नाही आहे. हे आधिच्या संशोधनात देखील स्पष्ट झालं आहे. त्यानंतरच्या संशोधनात देखील हे स्पष्ट झालं आहे. या इंजेक्शनमुळे जीव वाचत नाही. केवळ रुग्णालयातील मुक्काम चार दिवसांनी कमी होतो. हे औषध काही जादूची गोळी नाही, असं AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. लोकांचं असा समज आहे झाला आहे की, हे औषध घेतलं तर बरे होऊ. परंतु हा खोटा समज आहे, असं गुलेरिया म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे, असं स्पष्ट केलं. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. वेळेत ऑक्सिजन मिळालं नाही तर रुग्णाच्या इतर अवयवांवर कोरोनाचा प्रभाव होतो. ज्यांना ऑक्सिजन गरजेचं आहे त्यांना कसं देता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्याला हवं. रेमडेसिवीर एवढं प्रभावी नाही आहे, त्यामुळे त्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं नाही आहे असं माझं मत आहे, असं AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -