कोरोनावर संशोधन करणाऱ्या चीनी संशोधकाची अमेरिकेत हत्या

Professor Bing Liu
प्राध्यापक बिंग लिऊ

कोरोना व्हायरसची उत्पती चीनच्या वुहान प्रयोगशाळेत झाली, अशी शंका अमेरिकेसहीत जगातील अनेक देशांना आहे. चीनमधील एक मेडिकल रिसर्चर याच विषयावर अमेरिकेत कोरोनावर संशोधन करत होता. आपल्या संशोधनाच्या अखरेपर्यंत हा संशोधक आला होता. मात्र त्याआधीच त्याची अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पिट्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक असलेले ३७ वर्षीय बिंग लिऊ हे रॉस टाऊनशीप येथील आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत.

रॉसच्या पोलीस विभागाने सांगितले की, प्राध्यापक बिंग लिऊ यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. पिट्सबर्ग येथील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हाऊ गू (वय ४६) ही व्यक्ती गाडीत मृत आढळून आलेली आहे. कदाचित या व्यक्तीनेच बिंग लिऊ यांचा खून केला असावा आणि पळून जात असताना स्वतःच्या गाडीत त्याने आत्महत्या केली असावी.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघेही एकमेकांना ओळखत असावेत. बिंग लिऊ ये चीनी असल्यामुळ त्यांची हत्या केली असावी का? ही शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. बिंग यांच्या मृत्यूनंतर पिट्सबर्ग विद्यापीठाने शोक व्यक्त केला आहे. “बिंग हे एक उत्तम संशोधक होते. आम्ही त्यांच्या कुटुंबियाप्रती सहवेदना अर्पित करतो”, असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले.

प्राध्यापक बिंग लिऊ यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, “बिंग हे सार्स आमि कोविड २ च्या सेल्यूलरची रचनेचा अभ्यास करत होते. सेल्यूलर आणि कोविडचा इन्फेक्शन याबाबतचा संबंधाचा ते संशोधन करत होते. ते अतिशय मेहनती आणि हुशार संशोधक होते.”