घरCORONA UPDATEसॅनिटायजर वापरल्यामुळे रोजा तुटतो? मौलाना कारी म्हणतात...

सॅनिटायजर वापरल्यामुळे रोजा तुटतो? मौलाना कारी म्हणतात…

Subscribe

जमीयत दावतुल मुसलमीन यांचे संरक्षक प्रसिद्ध अलीम इमाम मौलाना कारी इसाक गोरा यांच्या नेतृत्वात रोजा ठेवणाऱ्यांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर रोजेदार अनेक प्रश्न विचारून आपल्या समस्या सोडवतात. रोजेदारांना सांगितले गेले की, ज्यांनी रोजा ठेवला आहे त्यांचे आशीर्वाद अल्लाह त्वरित स्वीकारतात. म्हणूनच रोजेदारांनी त्यांच्या देशात पसरलेल्या कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या समाप्तीसाठी प्रार्थना केली पाहिजे. तसेच, लॉकडाऊनचा नियम न तोडता उपवास ठेवला पाहिजे.

यावेळी प्रश्न विचारताना शेखपुरा कदीम येथील रहीवासी राव मुस्तफा यांनी विचारले की, रोजा असताना हातावर सॅनिटायझर लावू शकतो का?  सॅनिटायझरमुळे उपवास तर मोडणार नाही ना? याचं उत्तर देताना म्हटले आहे की, रोजा असतानाही तुम्ही हातावर सॅनिटायझर लावू शकता. रोजाच्या काळात हातावर सॅनिटाईझर लावल्यामुळे अजिबात उपवास मोडत नाही.

- Advertisement -

धोबीवाला येथे राहत असलेल्या नईम यांनी विचारले की, आमच्या मोहल्ल्यात असलेल्या मजदूर यांनी लॉकडाऊनमुळे अवस्था फार वाईट झाली आहे. अनेक वेळा त्यांना खाण्या पिण्यासाठी अनेक वेळा विचार करावा लागतो. जवळच कोणीतरी रेशन वाटतं. आम्ही तीथूनच रेशन घेऊन येतो. आता अशा परिस्थीतीत आम्ही काय करायला हवे. नईम यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना कारी इसहाक गोरा यांनी सांगितले की, हे वाचून खूप वाईट वाटलं. गरीबांची थट्टा करणारा व्यक्ती हा गुन्हेगार मानला जातो. त्यामुळे थट्टा करणाऱ्यांनी मजूरांची थट्टा न करता पुढे येऊन मदत केली पाहिजे.

तर तितरों येथील निवासी गुफरान खान म्हणाले की, मी रोजाच्या काळात शेतात काम करत होते. यावेळी मला अचानक मधमाशी येऊन चावली. आता अशावेळी रोजा राहीला की मोडला. यावर उत्तर देताना कारी इसहाक गोरा म्हणाले की, मधमाशी चावली असेल तर तुमचा रोजा तुटू शकत नाही.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोना व्हायरसमुळे लाखो मुलांचे जीव धोक्यात- युनिसेफ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -