घरताज्या घडामोडीCorona Vaccine: वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवा, DCGI चा सीरम इन्स्टिट्यूटला आदेश

Corona Vaccine: वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवा, DCGI चा सीरम इन्स्टिट्यूटला आदेश

Subscribe

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) आदेश देण्यात आला आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवण्याचा भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) आदेश देण्यात आला आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतले जाऊ नये, असे डीसीजीआयने आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार; लसीच्या दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने बुधवारी यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. तर भारतात ‘कोव्हीशिल्ड’ नावाने सीरम इन्स्टिटय़ूटकडून लस उत्पादित केली जात होती. यासाठी त्यांनी चाचण्याही सुरु केल्या होत्या.

मात्र, युकेमधील एका व्यक्तीला ही लस देण्यात आली होती. परंतु, त्या व्यक्तीमध्ये दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीरम इन्स्टि्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी गुरुवारी यासंबंधी बोलताना भारतात पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणारी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवत असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

सीरम इन्स्टि्यूटने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच अ‍ॅस्ट्राझेन्का जोपर्यंत नव्याने चाचणीला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपण ही लस थांबवली असल्याचे निवेदन प्रसिद्ध करत सांगितले आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टि्यूटकडून २७ ऑगस्टला पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात केली होती. त्यानंतर वढू बुद्रुक येथील के ईएम रुग्णालय आणि ससून रुग्णालयात या चाचण्यांचा भाग म्हणून स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. त्याअंतर्गत १०० स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली असून त्याबाबतच्या निरीक्षणांवर आधारित अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. तर, पुढील आठवड्यात तिसऱ्या टप्याला सुरुवात करत देशभरातील १७ वेगवेगळ्या ठिकाणी १६०० स्वयंसेवकांना लस दिली जाणार होती. मात्र, नोटीस मिळाल्यानंतर काही वेळात सीरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. आपल्याला चाचणी थांबवण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचं त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं.


हेही वाचा – कुलभूषण जाधव यांना भारतीय वकिल देण्यास पाकिस्तानचा नकार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -