घरCORONA UPDATEशाहीनबाग बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; दिल्लीने कोरोनाचे हॉटस्पॉट वाढवले

शाहीनबाग बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; दिल्लीने कोरोनाचे हॉटस्पॉट वाढवले

Subscribe

सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलनाचं केंद्रस्थान बनलेला शाहीनबाग परिसर आता कोविड-१९च्या क्लस्टर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात सुमारे १०० दिवस सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलन सुरु होतं. शाहीनबाग परिसर सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं होतं. दरम्यान, आता हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. हा परिसर दिल्ली सरकारने गुरुवारी कोविड-१९च्या क्लस्टर कंटेनमेंट झोनच्या यादीमध्ये टाकला आहे. यासोबतच अबुल फजल एन्क्लेव्हमधील रस्ता क्रमांक ६ आणि शाहदरा येथील पूर्व राम नगरातील रस्ता क्रमांक ३ आणि रस्ता क्रमांक ५ हे परिसर कोविड-१९च्या क्लस्टर कंटेनमेंट झोनच्या यादीमध्ये टाकले आहेत.


हेही वाचा – खोकल्याच्या आवाजावरुन ओळखता येणार कोरोनाचा रुग्ण

- Advertisement -

तथापि, दिल्लीतील कोविड-१९ क्लस्टर कंटेनमेंट झोनची यादी ६० वर पोहचली आहे. हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर दिल्ली सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. तर अधिकारी डोर-टू-डोर स्क्रीनिंगसह परिसर स्वच्छ ठेवत आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची १७८ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ३२ लोक मरण पावले आहेत आणि ४२ जण बरे झाले आहेत.

- Advertisement -

list of Covid-19 clusters in Delhi 4

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -