घरCORONA UPDATEनितीन गडकरी यांनी सांगितला 'आत्मनिर्भर' होण्याचा खास फॉर्म्यूला!

नितीन गडकरी यांनी सांगितला ‘आत्मनिर्भर’ होण्याचा खास फॉर्म्यूला!

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आत्मनिर्भर होण्याचा खास फॉर्म्यूला सांगितला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात १८ मे पासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात होईल. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. मोठ्या संख्येने लोकं बेरोजगार झाले आहेत. राज्यांकडून केंद्राकडे मोठ्या पॅकेजची घोषणा होत आहे. यादरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. यावर मोदींनी आत्मनिर्भर होऊयात असे आवाहन जनतेला केले. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आत्मनिर्भर होण्याचा खास फॉर्म्यूला सांगितला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या विकासात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे २९  टक्के योगदान आहे. एमएसएमईची निर्याती ४८  टक्के असून ११ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध आहे. पुढे गडकरी म्हणाले की, आपल्याला ती वाढवून जीडीपीच्या ५० टक्के आणली पाहिजे. जे महत्त्वाचे आहे त्याचा पर्याय आपण देऊ शकतो. आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपल्याकडे कौशल्य आहे. त्याचप्रमाणे पुरेसा कच्चा माल देखील उपलब्ध आहे. आमच्याकडे जलशक्ती, दळणवळण, वाहतूक या सर्व आवश्यक गोष्टी आहेत. आम्ही निश्चितपणे आयात कमी करू शकतो असे गडकरी म्हणाले.

- Advertisement -

मोदी सरकारचे ज्येष्ठ मंत्री म्हणाले की, आयात जितकी कमी होईल तितकी निर्यात वाढेल, आपली अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. यासह आपण स्वावलंबी भारताच्या दिशेने जाऊ. ते म्हणाले की कोरोनाबरोबरच आपल्याला आर्थिक लढाईही जिंकली पाहिजे. देशाला स्वावलंबी तसेच आर्थिक शक्ती बनविण्यासाठी आता वेगवान गतीने काम करावे लागेल.


हे ही वाचा – Breaking: छोट्या उद्योगांसाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचे कर्ज – अर्थमंत्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -