घरCORONA UPDATECoronaVirus: तबलीग जमातच्या कोरोनाग्रस्तांचे नर्सेससमोर अश्लील हावभाव!

CoronaVirus: तबलीग जमातच्या कोरोनाग्रस्तांचे नर्सेससमोर अश्लील हावभाव!

Subscribe

राजधानी दिल्लीत झालेले निजामुद्दीन येथील ‘आलमी मरकज’ या तबलीग जमातच्या धार्मिक कार्यक्रमामुळे अनेक राज्याची चिंता वाढली. या कार्यक्रमातील लोकांचा २० राज्यांशी संबंध असल्याच समोर आलं आहे. या कार्यक्रमातील तीनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. यातील अनेक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र याच कार्यक्रमातील लोकांबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाझियाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले तबलीग जमातचे संशयित कोरोनाग्रस्त लोक हे नर्सेस समोर अश्लील कृत्य करत असल्याच समोर आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे संशयित कोरोनाग्रस्त रुग्ण नर्सेस समोरच स्वतःचे कपडे उतरत तसंच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करत असल्याचं समोर आलं आहेत. यापूर्वी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तबलीग जमातच्या कार्यक्रमात उपस्थितीत असलेले लोक क्वारंटाईन दरम्यानच नमाज अदा करण्यासाठी एकत्र आल्याचे दिसले. याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरस झाला होता. तसंच दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकणे. याशिवाय बिहारमध्ये चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करने असे अनेक प्रकार समोर आले आहे.

आता त्यानंतर हा गाझियाबाद येथील प्रकार समोर आला. याप्रकरणी सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तरुंगात किंवा बरॅकमध्ये टाकण्याचा विचार सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नमाजच्या नावाखाली नियमांचं उल्लंघन करणं ‘हराम’ – मौलाना महमूद मदानी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -