घरCORONA UPDATEकोरोना निगेटिव्ह झालात तरी चिंता कायम, रुग्णांमध्ये दिसली 'ही' लक्षणं

कोरोना निगेटिव्ह झालात तरी चिंता कायम, रुग्णांमध्ये दिसली ‘ही’ लक्षणं

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरही त्यांना सोमवारी AIIMS रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या ३-४ दिवसांपासून ते थकवा आणि शरीर दुखत असल्याची तक्रार करत होते. याचाच अर्थ कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही रूग्णांमध्ये थकवा आणि शरीर दुखत असल्याची लक्षणं दिसून येत आहेत. हे बघता उद्यापासून (गुरूवार) दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोव्हिड-19 क्लिनिक सुरू होत आहे.

रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.बी.एल.शेरवाल यांनी सांगितले की, तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात असा होत नाही. डॉ. बी.एल. शेरवाल यांनी असे सांगितले की, कोरोनातून जास्त लोक बरे होत आहेत. मात्र निरोगी झालेल्या बऱ्याच रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. त्यामुळे आता पोस्ट कोव्हिड – १९ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यामुळे रूग्णांमधील कोरोनामधून बरे होण्यासाठी कार्यपद्धती किती वेगळी आहे हे समजून घेण्यास मदत होईल.

- Advertisement -

आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. कोरोनामुळे बरे झालेल्या रूग्णाला श्वासोच्छवासाची समस्या असते. तर दुसऱ्या रूग्णाला खोकल्याचा त्रास होतो. तर काही रूग्णाला फुफ्फुसाचा आजार झाला आहे. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश आहे.

घरी ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर मिळणार

रूग्ण कोरोनाचा रिपोर्ट घेऊन घरी गेला तरी त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बरे झाल्यानंतरही रुग्ण पूर्णपणे निरोगी होत नाहीत. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खालवते, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यू होतो. . म्हणूनच, कोरोनोतून बरे झालेल्या रूग्णांच्या घरी आता ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर पाठवण्याची तयारी दिल्ली सरकार करीत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – सावधान! जीन्स वापरत असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा, कारण तुमच्या जीवावर बेतू शकतं


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -