Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus: देशात कोरोनाचा कहर, मात्र 'या' केंद्रशासित प्रदेशात कोरोना नावापुरता

Coronavirus: देशात कोरोनाचा कहर, मात्र ‘या’ केंद्रशासित प्रदेशात कोरोना नावापुरता

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. पुन्हा एकदा २०२० मधली परिस्थिती उद्भवताना दिसत आहे. एका दिवसाला ७० किंवा ८० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या कोरोना रोखण्यासाठी कोरोना चाचणी आणि लसीकरणावर अधिक भर दिला आहे. महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये एकूण कोरोनाचे रुग्ण हजारांहून अधिक आहे. मात्र एका केंद्रशासित प्रदेशात कोरोना हा नावापुरता असल्याचे दिसत आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या हजारापेक्षा कमी आहे.

देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. पण लक्षद्वीपमध्ये कोरोना परिस्थिती स्थिर असल्याचे दिसत आहे. माहितीनुसार जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या माहितीनुसार, आता लक्षद्वीपमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ७२६ आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ६८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४८ हजारांहून अधिक जणांची कोरोना चाचणी येथे झाली आहे. देशातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप आहे. लक्षद्वीप हे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. इथली लोकसंख्या ६४ हजारांहून अधिक आहे.

- Advertisement -

दरम्यान देशातील एकूण कोरोनाबाधितांची १ कोटी २३ लाख ३ हजार ७६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६३ हजार ४३४ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १५ लाख २३ हजार २८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख १२ हजार १७४ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Covid-19 रुग्णसंख्येत महाराष्ट्राने जर्मनीला केले ओव्हरटेक!


- Advertisement -

 

- Advertisement -