Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश इशारा! देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत? अजून वर्षभर काळजी घेणं गरजेचं

इशारा! देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत? अजून वर्षभर काळजी घेणं गरजेचं

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बाधितांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, नागरिकांना किमान एक वर्ष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात जगभरातील ४० आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, साथीच्या रोगाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचा समावेश होता. त्यांच्याकडून ३ ते १७ जून दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात अभिप्राय घेण्यात आला.

करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, ८५ टक्क्यांहून अधिक म्हणजे २४ पैकी २१ जणांनी असे सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येणार आहे. त्यापैकी ३ जणांनी ऑगस्टच्या सुरूवातीस आणि १२ जणांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला. उर्वरित तिघांनी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येईल असे सांगितले. यासह ७० टक्क्यांहून अधिक तज्ज्ञ म्हणजेच ३४ पैकी २४ जणांनी असे सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट ही कोरोनाच्या दुसर्‍यापेक्षा चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते. सध्या देशात असणारी कोरोनाची लाट अधिक प्राणघातक ठरली. त्यामुळे या काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे देखील समोर आले.

- Advertisement -

यासह दुसरीकडे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल असे सांगितले, येणाऱ्या नवीन तिसऱ्या लाटेवर सध्या असलेल्या परिस्थितीपेक्षा आणखी नियंत्रण असेल. तिसरी लाट येईपर्यंत बर्‍याच लोकांना कोरोनाची लस दिलेली असेल. तर लहान मुलांसह १८ वर्षांखालील मुलांवर संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेसंदर्भात तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहे. ४० पैकी २६ तज्ज्ञांनी असे सांगितले की, तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होईल. तर यातील १४ जणांनी याउलट परिस्थिती असल्याचे सांगत मुलांना धोका नसल्याचे मत व्यक्त केले.


भारतीयांना लवकरच चौथी कोरोना लस होणार उपलब्ध! zydus cadila च्या मान्यतेसाठी अर्ज करणार

- Advertisement -