Corona Update Live: २४ तासांत राज्यात ७९० नव्या रुग्णांची भर! रुग्णसंख्या १२ हजारांवर!

coronavirus live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट
राज्यातल्या रुग्णांची संख्या शनिवारी १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ७९० नव्या रुग्णांची भर पडली आहे. शिवाय गेल्या २४ तासांमध्ये ३६ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत २ हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची आकडेवारी आहे.

अंबरनाथ पोलीस ठाण्यात असलेल्या ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कात आलेल्या ५ कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्यात मुंबईहून काही कामानिमित्त आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील जे १० ते १२ पोलीस या पोलिसाच्या संपर्कात आले होते त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात अंबरनाथचा हा ३० वर्षीय पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला.

देशभरात गेल्या २४ तासंमध्ये २२९३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रशासन आणि विविध राज्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.


मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलिसांनी काँक्रिट मिक्सरमधून लपून प्रवास करणाऱ्या १८ लोकांना पकडले. डीएसपी उमाकांत चौधरी म्हणाले की, सर्व जण महाराष्ट्रातून लखनऊला जात होते. आता ट्रक पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला आहे आणि एफआयआर दाखल केले आहे.


लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार तसेंच नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी संवाद साधला तसेच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


गेल्या २४ तासांच देशात कोरोनाग्रस्त ७१ रुग्णांचे बळी गेले आहेत. तसंच २ हजार २९३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा १ हजार २१८वर पोहोचला असून एकूण रुग्णांचा आकडा ३७ हजार ३३६ झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.


राज्यात कोरोनाचा विषाणूचा फैलाव वाढत आहे. दरम्यान पुण्यात ६८ वर्षीय कोरोनबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. पुण्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे.


जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांहून अधिक झाला आहे. सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे ११ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जॉन्स हॉपकिंग विद्यापिठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत १ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ६५ हजारपार गेला आहे.


देशातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात ४ मे पासून १७ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनदरम्यान ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सूट देण्यात आल्या आहेत.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मिळणार ही सूट

देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलेय. ग्रीन झोनमध्ये आर्थिक घडामोडींना सूट देण्यात आलीय. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, ग्रीन झोनमध्ये ३०७ जिल्ह्यांत बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणार्‍या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.


राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल १००८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ५०६वर पोहचला आहे. म्हणून संचारबंदी उठवल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी मुंबईमध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८५वर पोहचला आहे.