घरCORONA UPDATEVideo : कोरोनाचा रुग्ण बरा होताच डॉक्टरने केला 'मूनवॉक'

Video : कोरोनाचा रुग्ण बरा होताच डॉक्टरने केला ‘मूनवॉक’

Subscribe

रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून डॉक्टर नाचू लागले.

वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेढले आहे. या व्हायरसची लाखो लोकांना लागण झाली आहे. तसेच या लाखो लोकांना वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टक एका कोरोना रुग्णावर उपचार केल्यानंतर तो बरा झाल्याने मूनवॉक करत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ तुर्की मधील एका डॉक्टरचा आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर मूनवॉक करताना दिसत आहे. हा डॉक्टर एका वृद्ध कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून रुग्णाची प्रकृती सुधारत नव्हती. मात्र, त्याच्या प्रकृतीत जराशी सुधारणा पाहून या डॉक्टरांना फारच आनंद झाला आहे. याच आनंदात त्यांनी चक्क रुग्णालयात डान्स केला. विशेष म्हणजे हा डान्स असा तसा नसून मूनवॉक डान्स केला.

मिळालेल्या माहितीनुसार; या डॉक्टरांचे नाव अदनान वुरल आहे. ते Hecettepe विद्यापीठाच्या रुग्णालयात कार्यरत आहेत. जे तुर्की येथील अंकारा येथे आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका वृद्धाला रुग्णालयात दाखल केले होते. त्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचार करुनही त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. त्यामुळे त्या रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून देखील टाकण्यात आले. मात्र, ‘अचानक रुग्णाची प्रकृती सुधारली. ते पाहून मला फार आनंद झाला. हा डान्स त्याच आनंदाचे रिफ्लेक्शन होते’, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अदनान यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनच्या काळात लोकसंख्या वाढीची चिंता; या राज्यात वाटले मोफत कंडोम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -