Coronavirus: वुहानच्या दोन डॉक्टरांचा रंग बदलला, संसर्ग झाल्यानंतर चेहरा झाला काळा

चीनमधील वुहान शहर, ज्यापासून हा रोग सुरू झाला, आता तिथं उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांचा रंग काळा झाला आहे, यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Two Wuhan doctors change color
वुहानच्या दोन डॉक्टरांचा रंग बदलला, संसर्ग झाल्यानंतर चेहरा झाला काळा

चीनमधील वुहान शहर कोरोना विषाणूचे जनक असल्याचे मानलं जातं. यावेळी संपूर्ण जग कोरोना विषाणूंमुळे त्रस्त आहे आणि एक लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. चीनमधील वुहान शहर, ज्यापासून हा रोग सुरू झाला, आता तिथं उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांचा रंग काळा झाला आहे, यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दोन्ही डॉक्टरांना कोरोनाच्या रूग्णांवर उपचार कोरोनाचा संसर्ग झाला. दोन्हीही डॉक्टर उपचारानंतर वाचले आहेत. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या डॉक्टरांच्या यकृतावर विषाणूचा परिणाम झाल्याने त्यांचा चेहरा काळा झाला.

Two Wuhan doctors change color
डॉ. यी फॅन

डेली मेलच्या वृत्तानुसार, वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधील रूग्णांवर उपचार करत असताना ४२ वर्षीय डॉ. यी फॅन आणि डॉ. हू वेफेंग यांना जानेवारीत कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे दोन डॉक्टर चीनमधील कोरोना विषाणूच्या व्हिसल-ब्लोअर ली वेनलिंगचे भागीदार आहेत, ज्यांना विषाणूचा खुलासा केल्यानंतर शिक्षा झाली आणि ७ फेब्रुवारीला या आजाराने मृत्यू झाला.

face black when infected
डॉ. हू वेफेंग

हेही वाचा – भारतीय लोकांच्या मुस्लिमविरोधी पोस्टवरुन युएई नाराज; राजकुमारीने दिला इशारा


डॉ. यी फॅनने वुहानमध्ये हृदय रोग तज्ञ म्हणून काम करत होते. ३९ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर त्यांनी कोरोना विषाणूवर विजय मिळवला. ज्या मशीनद्वारे त्यांना वाचवण्यात आलं त्यांला ईसीएमओ असं म्हणतात. दरम्यान, सोमवारी स्थानिक टीव्ही चॅनेल सीसीटीव्हीशी बोलताना डॉ. यी म्हणाले की ते बरे झाले आहेत व ते सामान्यपणे झोपायला जाऊ शकतात, परंतु चालायला अद्याप सक्षम नाही आहेत.

“जेव्हा मी शुद्धीत आलो, विशेषत: जेव्हा मला माझ्या परिस्थितीबद्दल कळालं तेव्हा मला भीती वाटली. मला बर्‍याचदा वाईट स्वप्न पडत असत,” असं डॉ. यी यांनी पत्रकारांना सांगितलं. ते म्हणाले की ते मानसिक समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की डॉक्टर नेहमीच त्याला सांत्वन देत असत आणि त्याच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करत असत.