घरदेश-विदेशजगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा 'या' ३३ देशात एकही रूग्ण नाही! 

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा ‘या’ ३३ देशात एकही रूग्ण नाही! 

Subscribe

गेल्या 2 महिन्यांमध्ये कोमोरोस, लेसोथो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि पॅसिफिकमधील नऊरू, किरीबाती आणि सोलोमन बेट यांसारख्या दूरवरच्या बेटांसह एकूण 33 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून देशातील कोरोनाबाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. सध्या जगभरात 32 लाख 56 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. एकट्या अमेरिकेत 63 हजार 733 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशी परिस्थिती असताना देखील जगात असे काही 33 देश आहेत, ज्या देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा अवघा एकही रुग्ण सापडला नाही आहे. कदाचित हे खोटं वाटेल पण नाही हे सत्य आहे.

33 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

चीनच्या वुहानमधून सर्व जगभर पसरलेल्या या कोरोनाने अक्षरशः शंभराहून अधिक देशात कहर केला आहे. परंतू मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 महिन्यांमध्ये कोमोरोस, लेसोथो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि पॅसिफिकमधील नऊरू, किरीबाती आणि सोलोमन बेट यांसारख्या दूरवरच्या बेटांसह एकूण 33 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

- Advertisement -

गुरूवारी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 20 एप्रिल पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या 247 देशांपैकी 214 देशांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. यापैकी 186 देशांमध्ये कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशनचा टप्पा सुरू आहे. दरम्यान काही तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा फैलाव अमेरिका, युरोपातून आशिया आणि आफ्रिका खंडात होणार आहे. तर काही वैज्ञानिकांच्या मते कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असून दुसरा कोणताही पर्याय नाही.

१० लाखांहून अधिकांनी केली कोरोनावर मात!

गुरुवार संपूर्ण जगात या जीवघेण्या कोरोना व्हायरसापासून मुक्त झालेल्यांचा आकडा १० लाखांहून अधिक झाला आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १० लाख १४ हजार ७६१ लोकांनी कोरोना व्हायरसवर मात करून बरे झाले आहेत. या आकडेवारीमुळे असे कळते की, कोरोनामुळे फक्त मृत्यू होत नसून त्यावर मात करणे देखील शक्य आहे. जगभरात आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


केंद्राच्या यादीनुसार राज्यात असं आहे जिल्ह्यांचं रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये वर्गीकरण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -