Live Update: राज्यात २४ तासांत ९०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, १५ जणांच्या मृत्यूची नोंद

India corona update rain update omicron dr babasaheb ambedkar Mahaparinirvan Din 6 december param bir singh
India corona update rain update omicron dr babasaheb ambedkar Mahaparinirvan Din 6 december param bir singh

राज्यात गेल्या २४ तासांत ९०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख २८ हजार ७४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार ७०७ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ७२ हजार ७०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ११ हजार ७०४ जणांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत गेल्या २४ तासांत २३८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर २७२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ६० हजार ७३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३०२ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ३९ हजार ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २ हजार ८०८ जणांवर उपचार सुरू आहेत.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मी प्रत्येकाच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

HindiVersionOfManikeMageHithe

Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !

Lyrics by – Dev
#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani
#HindiVersionOfManikeMageHithe

Ashish.panda Bharat Goel

Posted by Amruta Fadnavis on Friday, November 19, 2021

 


माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ३० दिवसांच्या आत कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.


केंद्रीय कृषी कायदे देशातील शेतकरी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते- शरद पवार


अंधेरीच्या प्राईम मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल


आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही- राकेश टिकैत


मोदींच्या तीन कृषी कायदा रद्द करण्यावर राहुल गांधींचे ट्वीट


मोदींच्या तीन कृषी कायदा रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेवर जयंत पाटलांचे ट्वीट


आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने मोदींनी कृषी कायदे मागे घेतला- बाळासाहेब थोरात


मोदींच्या तीन कृषी कायदा रद्द करण्याच्या घोषणेवर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांची प्रतिक्रिया


तीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावे, पंतप्रधान मोदींचे आंदोलन शेतकऱ्यांना आवाहन


दीड वर्षांनंतर आता कर्तारपूर साहेब कॉरिडॉर पुन्हा सुरु झाला, तीन कृषी कायदा मागे घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वाजता देशवासियांशी साधणार संवाद


मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या असून स्क्रूटनी कमिटीकडून त्यांच्या जात प्रमाणपत्राची आता चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुंबई पोलीस एसआयटी  स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. याशिवाय आणखी दोन जणांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रूटनी कमिटीनं देखील याप्रकरणी तपास सुरु केला आहे.