घरदेश-विदेशLive Update: शरद पवारांचा विदर्भ दौरा पुढे ढकलला

Live Update: शरद पवारांचा विदर्भ दौरा पुढे ढकलला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा विदर्भातील दिनांक १९ व २० नोव्हेंबर शुक्रवार शनिवार यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख २६ हजार ८७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ७६६ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ७० हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात ११ हजार ७६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासांत २७५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७ लाख ६० हजार २७०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार २९९ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ३८ हजार ५९९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत २ हजार ८२१ सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -


राष्ट्रपती भवनात सोमवारी रात्री घुसलेल्या कपलला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काय आहे नेमकी घटना वाचा? 


एसटी कर्मचाऱ्यांचा संप आझाद मैदानात अजूनही सुरुच.


पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगपती राज कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत २२ नोव्हेंबर) पुढे ढकलली आहे.


खासदार संजय राऊत मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घेतली राज ठाकरेंची भेटी


सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा होणार २० नोव्हेंबरला, एमपीएससीकडून प्रवेशपत्र आणि मार्गदर्शक सूचना जाहीर


अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अनिकेतच्या आई-वडलांविरोधातही गुन्हा दाखल


संपूर्ण देशात आणि जगात गांधींच्या विचारांचा प्रभाव आहे- संजय राऊत

बाळासाहेब महान योद्धे, हिंदूंसाठी आदर्श होते- संजय राऊत


रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी, मालेगाव दगडफेक प्रकरणी छापेमारी, बुधवारी रात्री २ तास सुरु होती कार्यालयाची झाडाझडती,


योगानंद शास्त्राींचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुलाब्यातील बाळासाहेबांच्या स्मारकाला केले अभिवादन

हिंदु ह्रदयसम्राट दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल


ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची आज पत्रकार परिषद,  विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉटेल येथे सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -