देशात कोरोनाबाधित संख्या दिवसागणिक वाढत असली तरी मृत्यूची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. देशात २४ तासांत ३००हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत देशात ५३ हजार ४८० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ हजार २८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधिताची संख्या १ कोटी २१ लाख ४९ हजार ३३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४६८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १४ लाख ३४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५ लाख ५२ हजार ५६६ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ कोटी ३० लाख ५४ हजार ३५३ जणांचे लसीकरण पार पडले आहे.
India reports 53,480 new #COVID19 cases, 41,280 discharges, and 354 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,21,49,335
Total recoveries: 1,14,34,301
Active cases: 5,52,566
Death toll: 1,62,468Total vaccination: 6,30,54,353 pic.twitter.com/XfWELl3Gel
— ANI (@ANI) March 31, 2021
देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. या राज्यांमध्ये सध्या कोरोना अपडेट काय आहे पाहा….
देशातील हे ‘पाच’ राज्य सर्वाधिक कोरोनाबाधित
राज्य कोरोनाबाधितांची संख्या मृत्यूची संख्या रिकव्हर रुग्णांची संख्या Active रुग्ण
महाराष्ट्र २७,७३,४३६ ५४,४२२, २३,७७,१२७ ३,४०,५४२
केरळ ११,२१,९३२ ४,६०७ १०,९२,३६५ २४,६४६
कर्नाटक ९,९२,७७९ १२,५४१ ९,५४,६७८ २५,५४१
आंध्र प्रदेश ९,००,८०५ ७,२१३ ८,८६,९७८ ६,६१४
तामिळनाडू ८,८४,०९४ १२,७००, ८,५६,५४८ १४,८४६