Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 4184 नवे रुग्ण, 104 मृत्यू

coronavirus update india records 4184 new cases and 104 death in last 24 hours active cases stands at 44488
Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 4184 नवे रुग्ण, 104 मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे राज्यासह देशातही कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 4 हजार 184 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,488 इतकी झाली आहे. बुधवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार केला असता, देशात बुधवारी कोरोनाचे 4 हजार 575 नवे रुग्ण आढळले होते तर 145 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तर मृतांच्या संख्येतही घट झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 488 इतकी झाली आहे. तसेच कोरोना मृतांची संख्या 5 लाख 15 हजार 459 वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 20 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात आत्तापर्यंत कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत 179 कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर बुधवारी दिवसभरात 18 लाख 23 हजार 329 डोस देण्यात आले. आतापर्यंत 179 कोटी 53 लाख 95 हजार 649 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.


Uttarakhand Elections 2022: उत्तराखंडचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेनही, अमित शाहांना हरीश रावत यांचे प्रत्युत्तर