घरदेश-विदेशLive Update : सोलापूरमध्ये वाळू माफियांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गणेश सोनलकर यांचा...

Live Update : सोलापूरमध्ये वाळू माफियांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गणेश सोनलकर यांचा मृत्यू 

Subscribe

सोलापूरमध्ये वाळू माफियांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गणेश सोनलकर यांचा मृत्यू , वाळू माफियांवर कारवाईसाठी गेल्या पोलिस कर्मचाऱ्याला गाडीखाली चिरडले


२२ ऑक्टोंबरपासून राज्यात थिएटर्स सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत, बॉलिवूड रोहित शेट्टी, मुख्य सचिव सिताराम कुंठे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व थिएटर्स कोरोनासंबंधीत नियम पाळून २२ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.

- Advertisement -

कामगारांचे प्रश्न सोडवताना राजकारण करु नये, माथाडी चळवळीसाठी सरकारचे दरवाजे खुले असले पाहिजे- देवेंद्र फडणवीस


आरोग्य विभागाच्या परीक्षांसंदर्भात उद्या बैठकीनंतर नवी तारीख जाहीर होणार- राजेश टोपे

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील आरोपी सचिन वाझेने सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नवा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी ओपन हार्ट सर्जरीनंतर पूर्णपणे बरे वाटेपर्यंत घरीच नजरकैदेत ठेवा अशी मागणी केली आहे. न्यायालयाने याची दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणांनी यावर भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली आहे.


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने पून्हा एकदा समन्स बजावला आहे. यामध्ये अनिल परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिला आहे. अनिल परबांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -