Live Update: ४ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर मोदी मायदेशात परतले

News Live Update
नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी राज्याला १२०० कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

४ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर मोदी मायदेशात परतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. जे पी नड्डांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत. दिल्ली एअरपोर्टवर भाजप कार्यतर्यांचा जल्लोष

गेल्या २४ तासांत २८,३२६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २६० कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच गेल्या २४ तासांत २६,०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 


अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु, १० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती


डाव्या कडव्या विचारसरणीच्या उग्रवादासंदर्भात समीक्षा तसेच नक्षलग्रस्त भागातील विकास योजना यासंदर्भामध्ये गृहमंत्रालयाने आज रविवार २६ रोजी आयोजित बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात नवी दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलिस महासंचालक संजय पांडे देखील आहेत. सकाळी ९ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचून त्यानंतर ते बैठकीच्या स्थळी म्हणजे विज्ञान भवनाकडे रवाना होतील. ही बैठक दुपारी २ वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनकडे रवाना होतील. दुपारी 3.20 वाजता दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईकडे प्रयाण होईल.


पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांत ८ हत्या शहरात झाल्या

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातल्या धावडेवस्ती मध्ये रात्री उशिरा 38 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे. कलावती धोंडिबा सुरवार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तीच्या घरात घुसून धारधार शास्त्राने वार करत तिची हत्या


मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना कोरोनाती बाधा झाली आहे. भायखळातील महिलांसाठी असलेल्या तुरुंगात गेल्या १० दिवसांत सहा मुलांसह ३९ जणांना कोरोनाची लागण