Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत २३० नव्या कोरोनाबाधितांची वाढ, एकाचा मृत्यू

coronavirus update 20 november weather alert Farm Laws Vidhan Parishad pm modi kisan vijay diwas
coronavirus update 20 november weather alert Farm Laws Vidhan Parishad pm modi kisan vijay diwas

कळवा येथील मफतलाल कंपनीची कोर्टाच्या ताब्यात असलेली जागा म्हाडा खरेदी करणार, गृहनिर्माण मंत्र्यांची ट्विटरद्वारे केली घोषणा


मुंबईत गेल्या २४ तासांत २३० नवे कोरोनाबाधित आढळले असून १ जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ६० हजार ५००वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ३८ हजार ८०३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २ हजार ८४५ रुग्ण सक्रीय आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत ९६३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ६७ हजार ८३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार ६९२ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ७१ हजार ७६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ११ हजार ७३२ सक्रीय रुग्ण ाहेत.


एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान काय झाले वाचा 


एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट


रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल


सतेज पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


नाना पटोले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला


एसटी कामगारांचा विषय भयावह होतोय, एस कर्मचाऱ्यांप्रती सरकारने संवेदनशीलता दाखवावी- चंद्रकांत पाटील


मुंबईतील पवईतील ह्युंडाई कंपनीच्या सर्विस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल


समीर वानखेडेंच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर धर्म मुस्लीम, कोर्टातील ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत, नवाब मलिकांचा दावा, ज्ञानदेव वानखेडेंविरोधात मानहानीचा दावा दाखल, वानखेडेंनी बनावट कागदपत्रे दिल्याचे सिद्ध होईल, भाजपाच्या मदतीने अनिल देशमुखांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे- नवाब मलिक


मालेगाव दंगल प्रकरणी आणखी काही जणांना अटक, आत्तापर्यंत दंगल प्रकरणी ५२ संशयितांना अटक, आरोपींकडून दंगलीतील नुकसानाची वसुली करण्याचा प्रस्ताव, रझा अकादमीच्या आयोजकांवरील कारवाई थांबवा- MIM आमदार मौलाना मुफ्ती यांची गृहमंत्र्यांकडे मागणी