Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaVirus Updates : देशात आज कोरोनाचे 1 लाख 41 हजार नवे रुग्ण,...

CoronaVirus Updates : देशात आज कोरोनाचे 1 लाख 41 हजार नवे रुग्ण, तर 285 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

यात दुसरीकडे देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शिवाय 11 जानेवारीपासून 60 वर्षावरील आजारी रुग्ण, आरोग्य कर्मचारी आ फ्रंटलाईन्स वर्कर्सना  कोरोना विरोधातील लसीकरण मोहीमेत सुरु होणार आहे.

देशात गेल्या आठवड्याभरापासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ही रुग्ण वाढ होत असून   भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान देशात सतत वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात आजही देशात जवळपास 30 हजारांच्या आजपास कोरोनाच्आया नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 41 हजार 986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona variant : ओमिक्रॉननंतरचा नवा व्हेरिएंट ठरणार प्राणघातक ; तज्ज्ञांचा दावा

सध्या देशात 4 लाख 72 हजार 169 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा 9.28 टक्क्यांवर पोहचला आहे. तर एकूण मृत्यांचा आकडा हा 4 लाख 83 हजार 178 वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

 


यात ओमिक्रॉनमुळे संक्रमणाच्या संख्येत वाढ आणि संभाव्य तिसरी लाट येण्याची भीती केंद्रीय आरोग्य विभागाला होती. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंट इतका घातक नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून देशात अनेक निर्बंध पुन्हा लादले जात आहेत.

- Advertisement -

यात दुसरीकडे देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शिवाय 11 जानेवारीपासून 60 वर्षावरील आजारी रुग्ण, आरोग्य कर्मचारी आ फ्रंटलाईन्स वर्कर्सना  कोरोना विरोधातील लसीकरण मोहीमेत सुरु होणार आहे. अशातच शुक्रवारी देशाने लसीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत १५० कोटी डोस देण्यात आले आहेत. सुरुवातीला धीम्या गतीने सुरू झालेल्या देशातील लसीकरण मोहीम ऑगस्ट २०२१ पासून वेगाने सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात लसीकरण मोहीमेसाठी चांगला होता. या महिन्यात तब्बल २४ कोटी डोस लोकांना देण्यात आले. १ डिसेंबरपासून दररोज ६८ लाख लोकांना लस दिली जात आहे.


Covid-19 Reinfection : याआधी कोरोना झालाय ? पुन्हा संसर्गाचा धोका कायमच, तज्ज्ञांसमोरही पेच

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -