घरताज्या घडामोडीLive Update: भारत बंद; उद्या अण्णा हजारे एक दिवसाचे उपोषण करणार

Live Update: भारत बंद; उद्या अण्णा हजारे एक दिवसाचे उपोषण करणार

Subscribe

शेतकरी आंदोलनाला भाजपचा पाठिंबा मिळाला आहे. उद्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर ते एक दिवस उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे उद्या कार्यकर्त्यांनी गर्दी न करताना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.


उद्याच्या भारत बंदमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन सहभागी होणार नाही आहेत. त्यामुळे उद्या ऑटो, रिक्षा टॅक्सी सुरू राहणार आहेत.

- Advertisement -

सध्या केवळ विरोधाला विरोध सुरू आहे. – फडणवीस


कृषी कायद्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल. – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

शिवसेनेकडूनही फळ, भाजीपाल नियमनमुक्तचं स्वागत करण्यात आले. -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


अकाली दलाकडूनही एपीएमसीला पर्याय शोधण्याची मागणी केली आहे. -देवेंद्र फडणवीस


काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हणण्यात आले होते की, ‘बाजारसमितीचा कायदा निरस्तर करण्यात येईल आणि शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल. बाजारसमित्यांचा कायद्या हा रद्द करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तु कायदा संपुष्ठात येईल आणि त्याजागी नवीन कायदा आणण्यात येईल.’ – देवेंद्र फडणवीस


आपले सरकार असताना ज्या गोष्टी झाल्यात, त्याच गोष्टी केंद्र सरकारने केल्या. काही पक्ष ट्रॅक्टर चालवू लागलेत. पण त्यांना कुठलही समर्थन महाराष्ट्रात मिळालेलं नाही – देवेंद्र फडणवीस


किमान लँड लिजिंगचा कायदा असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन गेलेली नाही. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करून किंमतीत बदल केली आहे. – देवेंद फडणवीस


ज्या कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. ते कायदे करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. २००६-०७ साली महाराष्ट्राने लँड लिजिंगचा कायदा केला, जो कायदा आज केंद्राने केला. जेव्हा युपीएचं सरकार केंद्रात आणि राज्यात होत, तेव्हा तो कायदा केला होता. मॉडेल एपीएमसी अॅक्ट, ज्यामध्ये खासगी बाजार समित्या तयार करण्यात येतात. हा देखील कायदा सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने केला. तो ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात केला. आज महाराष्ट्रात अनेक खासगी एपीएमसी चालल्या आहेत आणि त्या एपीएमसी चालत असल्यामुळे कुठलीही एपीएमसी बंद झालेली नाही आहे.  – देवेंद्र फडणवीस


कृषी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. तसेच उद्या भारत बंदचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यालाच आता विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आज खर म्हणजे या सर्व पक्षांची भूमिका किती दुटप्पी आहे, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.


अभिनेता वरुण धवनला कोरोनाची लागण झाली आहे. वरुणने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणला कोरोनाची लागण झाली. या चित्रपटात वरुणसोबतच नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत


मुंबईतील लालबाग येथील साराभाई इमारत सिलेंडर स्फोटातील जखमी मधील आणखी एकाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या स्फोटातील मृत्यूची संख्या दोन झाली असल्याची माहिती मिळतेय.

मुंबईतील लालबाग परिसरातील साराभाई इमारतीतील बंद खोलीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत १६ जण होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत रविवारी आज सकाळी ७ वाजून २३ मिनीटाच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या दोन गाड्या आणि दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.


देशात अद्याप कोरोनाचा कहर कमी झालेला नसून देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या २४ तासात ३२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान देशात झाले आहे. त्यामुळे सध्या बाधितांचा आकडा हा वाढून ९६ लाख ७७ हजार २०३ वर पोहोचला आहे. तर ३९१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.


ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने महामारी दरम्यान, विस्तृत स्तरावर वैद्यकीय गरजा आणि जनहित यांचा हवाला देत सीरमने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. याआधी शनिवारी अमेरिकी औषध निर्माती कंपनी फायझरने केंद्र सरकारकडे भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.


उद्या शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद

नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. ९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -