Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Coronavirus : युरोपियन देशांमध्ये डेल्टा, बीटा, गॅमापेक्षा 'हा' व्हेरियंट ठरतोय अधिक धोकादायक

Coronavirus : युरोपियन देशांमध्ये डेल्टा, बीटा, गॅमापेक्षा ‘हा’ व्हेरियंट ठरतोय अधिक धोकादायक

नव्या व्हेरियंटने प्रशासनाची चिंता आणखी वाढवली

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणुच्या नवनव्या व्हेरियंटने आता जगाला वेठीस धरले आहे. यात कोरोनाच्या डेल्टा, बीटा, गॅमा व्हेरियंटपेक्षा अनेक व्हेरियंट आढळत असल्याने अधिक चिंता व्यक्त होतेय. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट नेपाळमध्ये पहिल्यांदा आढळल्याचे वृत्त अनेक स्थानिक वृत्तसंस्थांनी दिले आहे. हा व्हेरियंट युरोपियन देशांमध्ये वेगाने पसरत असून यावर लशीचाही परिणाम होत नसल्याने चिंता अधिक वाढली आहे.

नव्या व्हेरियंटने प्रशासनाची चिंता आणखी वाढवली

परंतु या व्हेरियंटबाबत अधिक चिंता करण्याची गरज नसल्याचे मत ब्रिटन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समूहातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. कोरोनाचा विषाणू स्वरुप बदलत असल्याने नवनवे व्हेरियंट समोर येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्याची गरज नाही.

- Advertisement -

परंतु ब्रिटनमध्ये या नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण मोहिमेने वेग धरला असून जुलै- ऑगस्टमध्ये कोरोना संपूर्णपणे संपुष्टात येईल असा दावा शास्त्राज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी घट पाहता ब्रिटनमध्ये निर्बंध शिथिल होणार असल्याची शक्यता आहे. मात्र या नव्या व्हेरियंटने प्रशासनाची चिंता आणखी वाढवली आहे.

व्हिएतनाममध्ये आढळतोय नवा व्हेरियंट

व्हिएतनाममध्ये सध्या कोरोना विषाणुचा नवा व्हेरियंट आढळला आहे. हा व्हेरियंट हवेतून वेगाने पसरत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. हा व्हेरियंट ब्रिटन आणि भारतात आढळणाऱ्या व्हेरियंटचे मिश्रण असल्याते सांगितले जात आहे. या विषाणूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना सर्वप्रथम गळ्याचा संसर्ग होत असून कफचा त्रास वाढतोय. व्हिएतनामसह जवळपासच्या शहरांतही हा विषाणू वेगाने परसतो.


Honda ची सर्वाधित लोकप्रिय बाईक Honda Shine झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत


- Advertisement -

 

- Advertisement -