घरदेश-विदेशcorona vaccination : अमेरिकेत प्रौढांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग

corona vaccination : अमेरिकेत प्रौढांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग

Subscribe

आत्तापर्यंत एकूण प्रौढांपैकी ५० टक्के जणांना लसीचा पहिला डोस देऊन झाला

जगभरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून याचा सर्वाधिक फटका अमेरिका देशाला बसला. त्यामुळे अमेरिकेत लसीकरण मोहिम वेगाने सुरु झाली आहे. आत्तापर्यंत एकूण प्रौढांपैकी ५० टक्के जणांना लसीचा पहिला डोस देऊन झाला असल्याचे अमेरिकेने जाहीर केले. अद्याप अमेरिकेत अनेकांचे लसीकरण बाकी असून, नागरिकांनी कुठलाही संशय न घेता लस घ्यावी असे आवाहन अमेरिकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने निर्बंध कडक केले आहेत. तसेच अमेरिकन नागरिकांना भारतासह अन्य देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे. यामुळे अमेरिकेने लसीकरण मोहिमेवर बंदी घातली आहे. अमेरिकेने जवळपास १३ कोटी नागरिकांना (प्रौढांपैकी ५०.४ टक्के) लसीचा पहिला डोस दिला आहे तर ८.४ कोटी प्रौढांचे (३२.५ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. जगामध्ये कोरोना मृत्यूंनी तीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर अमेरिकेने आत्तापर्यंत निम्म्या लोकांना लस दिल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

अमेरिकेत लसीकरण वेगात सुरु असले तर इस्त्रायल, संयुक्त अरब अमिरात, चिली, ब्रिटन या देशांपेक्षाही कमी प्रमाण आहे. दर १०० व्यक्तींमागे अमेरिकेत ६१.६ डोस दिल्याचे सरासरी प्रमाण आहे. इस्त्रायलमध्ये हेच प्रमाण ११९.२ इतके आहे तर संयुक्त अरब अमिरात, चिली, ब्रिटन आदी देशांमध्ये हे प्रमाण ६२ हून अधिक आहे.

दरम्यान अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापरासाठी पुन्हा मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. या लशीच्या वापरानंतर काही नागरिकांच्या रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे समोर आले होते. मात्र योग्यत्या सुचना, बंधने घालत या लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -