Corona Vaccination: भारतात मंजुरी मिळालेल्या Covovax आणि Corbevax या लसींबाबत जाणून घ्या

coronavirus vaccine covovax corbevax malnupiravir emergency use dgci you know about this two vaccine
Corona Vaccination: भारतात मंजुरी मिळालेल्या Covovax आणि Corbevax या लसींबाबत जाणून घ्या

देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. आतापर्यंत २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला असून देशातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ६५३वर पोहोचली आहे. या भीतीदायक वातावरणादरम्यान आज दोन कोरोनाप्रतिबंधात्मक लसी आणि औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळल्याची सकारात्मक बातमी समोर आली. देशातील कोरोना महामारीची लढाई लढण्यासाठी आता ८ कोरोना प्रतिबंधात्मक लस झाल्या आहेत, ज्यांना आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे आज ज्या दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना मंजुरी मिळाली, त्यापैकी एक भारतात तयार केली आहे आणि दुसरी भारतात तयार होत आहे. जाणून घ्या या स्वदेशी बनावटीच्या लसीबाबत आणि कोरोना औषधाबाबत…

कोवोवॅक्स

कोवोवॅक्स ही लस अमेरिकन कंपनी नोवोवॅक्सने (Novavax) तयार केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेल्या यादीत कोवोवॅक्स सामिल आहे. ऑगस्ट २०२०मध्ये नोवोवॅक्स आणि भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करार झाला होता. त्या करारा अंतर्गत नोवोवॅक्सने कोवोवॅक्स लस सीरम इन्स्टिट्यूट बनवत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी दरम्यान कोवोवॅक्स कोरोना विरोधात ९० टक्के असरदार दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे या लसीची चाचणी ३ वर्षांवरील मुलांवर झाली आहे.

कोरबेवॅक्स

कोरबेवॅक्स लस भारताची कंपनी बायोलॉजिकस-ई तयार करत आहे. कोवॅक्सिन आणि झायकोव-डीनंतर कोरबेवॅक्स तिसरी भारतीय लस आहे. दरम्यान सरकारने यापूर्वीच बायोलॉजिकल-ईकडून १,५०० कोटी रुपयांमध्ये ३० कोटी डोस ऑर्डर केली होती. माहितीनुसार २८ दिवसांच्या आत या लसीचे डोस दिले जातील. ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियसदरम्यान स्टोअर केली जाऊ शकते.

१३ कंपन्यांनी बनवले कोरोनाचे औषध

ड्रग्स कंट्रोलरने कोरोनाचे औषध मोलनुपिराविरला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी Merck ने मोलनुपिराविर औषध तयार केले आहे. अलीकडेच अमेरिकेची फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने मोलनुपिराविर औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. आता भारताने देखील या औषधाला वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध भारतात सिप्ला, टोरंट आणि सन फार्मा सारख्या १३ कंपन्या तयार करत आहेत. हे औषध आता फक्त प्रौढांसाठी दिले जाईल. शिवाय ज्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आहेत आणि ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका अधिक आहे, त्यांना हे औषध दिले जाईल. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोलनुपिराविर दिले जाईल. 200mg च्या या औषधाचा कोर्स ५ दिवसांचा असेल. गर्भवती महिला आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना हे औषध मिळणार नाही.


हेही वाचा – Booster Dose India: बूस्टर डोससाठी तुमचा नंबर केव्हा येणार? सरकार पाठवणार SMS अलर्ट