Corona : सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम हॉस्पिटलमध्ये दाखल

एस पी बालसुब्रमण्यम

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली असून चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बालसुब्रमण्यम यांची बुधवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल, असेही सूत्रांकडून समजते. पार्श्वगायक बालसुब्रमण्यम ७४ वर्षांचे असून त्यांनी आज अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषेत पार्श्वगायन केले आहे. दरम्यान, त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला छातीत दुखत असल्याचे सांगितले. तसेच थोडा ताप असल्याने कोरोनाची चाचणी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –

‘तुम्ही शांत राहा, सीबीआय न्याय करेल’; भाजपचा राऊतांवर हल्लाबोल