घरदेश-विदेशCorona: लॉकडाऊननंतर 'या' सर्टिफिकेट शिवाय विमान प्रवास करणं अशक्य!

Corona: लॉकडाऊननंतर ‘या’ सर्टिफिकेट शिवाय विमान प्रवास करणं अशक्य!

Subscribe

लॉकडाऊननंतर हेल्थ चेकअप हा सुद्धा फ्लाइट्समधील प्रक्रियेचा भाग होणार

कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र रेल्वे किंवा हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला नाही आहे. परंतु, लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरू करण्यात आली तर प्रवाशांना प्रवास करण्यापुर्वी त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढील विमान प्रवास करताना कागदपत्रांसह ग्लोव्ह्ज, मास्क आणि डिस्पोजेबल कॅप्स देखील खरेदी कराव्या लागणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे अधिकाऱ्यांसह टेक्निकल कमिटी लॉकडाऊननंतरच्या विमान प्रवासासाठी नवीन नियमांबाबत चर्चा करत आहे. जेणेकरून विमान सेवा जरी सुरळीत झाली तरी देखील कोरोनाचे संक्रमण कमी होण्यास मदत होईल. रेल्वे तसेच विमान सेवा 15 मे पासून सुरळीत सुरू होण्याची आशा असून जूनपर्यंत हा लॉकडाऊन संपणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

CoronaVirus: कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मृत्यू, जाणून घ्या सत्य

कोरियन एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे क्रू मेंबर्स टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत चश्मा, फेस मास्क तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सावध राहतील, यासह काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दोन सीटच्या मधली सीट रिकामी ठेवण्याचा विचार करत आहेत.

दरम्यान ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार काही एअरलाइन्स हे नुकसान भरून काढण्यासाठी विमान प्रवासभाडं वाढवण्याच्या विचारात आहेत. लॉकडाऊननंतर हेल्थ चेकअप हा सुद्धा फ्लाइट्समधील प्रक्रियेचा भाग होणार आहे. त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा विमान प्रवासाआधी दाखवावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -