घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर ताप का येतो? जाणून घेऊ

Coronavirus : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर ताप का येतो? जाणून घेऊ

Subscribe

कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी, थकवा यांसारखी आजाराची तात्पुरती लक्षणे अनेकांमध्ये दिसून येत आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत. तर बहुतेकांना लसीकरणानंतर कोणत्याच आजाराची लक्षणे जाणवत नाहीत. यावेळी अनेकांना अशा प्रश्न पडतो की लसीकरणानंतर दिसणाऱ्या या आजरांच्या लक्षणांचा अर्थ काय? लसीच्या प्रभावाशी याचा काय संबंध आहे? परंतु या आजारांच्या तात्पुरत्या लक्षणांमुळए नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात संभ्रम निर्माण होत आहे. परंतु नागरिकांनी संभ्रम दूर करत लस घेतली पाहिजे.

या कारणासाठी येतो ताप ?

आपली रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी सिस्टम) दोन भागांत काम करते. पहिल्या भागांत कोणताही विदेशी व्हायरस किंवा जीवाणूचा शरीरात प्रवेश होताच रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. लस घेतल्यानंतरही आपल्या शरीरात बरोबर असेच घडत असते. यावेळी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी त्याभोवती जमा होता. त्यामुळे शरारीत इन्फ्लेमेशन होते. ज्यामुळे ताप, थकवा किंवा इतर लक्षणे दिसू लागतात. परंतु रोगप्रतिकारशक्तीची प्रक्रिया वयानुसार बदल असते. त्यामुळे वृद्ध लोकांपेक्षा तरुणांमध्ये लसीकरणानंतर काही आजारांची लक्षणे अधिक दिसतात.

- Advertisement -

कोणताही लक्षण न दिसल्यास लस अकार्यक्षम होती असे म्हणावे का?

अनेकदा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ताप, थकवा किंवा इतर कोणताही लक्षणे दिसत नाहीत. अशावेळी काहींच्या मनात खूप प्रश्न पडत असतात की, आपल्या रोगप्रतिकार शक्तीने लसीला काहीच प्रतिसाद कसा दिला नाही? त्यामुळे लस घेतल्याचा काहीच फायदा किंवा परिणाम झाला नाही का? परंतु असा विचार करणे चुकीचे आहे. कारण लसीकरणानंतर कोणत्याच आजाराची लक्षणे दिसली नाहीत तर याचा अर्थ लस अकार्यक्षम आहे असे होत नाही. कारण आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीचा दुसरा भाग लसीनंतर अँटीबॉडी बनवण्याचे काम करत असतो. या अँटीबॉडीमुळे कमी अधिक प्रमाणात दिसणाऱ्या लक्षणांविरुद्ध लढण्याचे काम केले जाते. त्यामुळे लसीकरणानंतर शरीरात विषाणुविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती अँटीबॉडी बनवण्याचे काम करते.

गंभीर लक्षणे आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लसीकरणानंतर बऱ्याच नागरिकांना गंभीर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लसीकरणानंतरचे दुष्परिणाम ओळखे सोप्पे जाते. परंतु त्यानंतरही काही गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करा. कारण त्वरित उपचार केल्यास सहज कोणत्याही आजाराचा सामना करता येतो.

- Advertisement -

मुंबईतील चांदिवलीदरम्यान असलेल्या मारवा रोड पुलाचा भाग कोसळला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -