घरCORONA UPDATECoronavirus: ...म्हणून जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे

Coronavirus: …म्हणून जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे

Subscribe

जर्मनीमध्ये कोरोनाचे ६७ हजार ०५१ रुग्ण आहेत. मात्र, ६५० जणांचाच मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ३८ हजार १०१वर पोहोचली आहे. जगभरात एकूण ७ लाख ८९ हजार ८०४ लोक संक्रमित आहेत. भारतात ही संख्या १२५१ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल सतत संशोधन होत आहे. जेणेकरून या विषाणूबद्दल अधिकाधिक माहिती मिळू शकेल आणि त्याची लस तयार होऊ शकेल. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण चीनपेक्षा दुप्पट झाले आहे. जर्मनीची परिस्थितीही तशीच आहे पण जर्मनीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मृत्यू दर खूपच कमी आहे. जर्मनीमध्ये कोरोनाचे ६७ हजार ०५१ रुग्ण आहेत. मात्र, ६५० जणांचाच मृत्यू झाला आहे. तर १३ हजार ५०० जण बरे झाले आहेत. जर्मनीमध्ये मृत्यू दर कमी का आहे? हे आपणास माहित आहे का? आणि यातून भारताला शिकण्याची गरज आहे का?


हेही वाचा – Coronavirus: कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स जूनपर्यंत चालणार…!

- Advertisement -

  • जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. जगातील सर्व देशांमध्ये सर्वात कमी आहे. इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण ४४ टक्के आहे. तज्ञांच्या मते, जर्मनीच्या व्यापक चाचणीमुळे जर्मनीतील मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. इतर देशांमध्ये, केवळ कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांचीच चाचणी घेतली जात आहे, तर जर्मनीमध्ये सर्वांची चाचणी घेण्यात येत आहे.
  • जर्मनी सध्या जगातील पाचव्या क्रमांकाचा कोरोना संक्रमीत असलेला देश आहे. तथापि मृत्यू दर प्रत्येक देशात भिन्न असू शकतो, जो संपूर्णपणे चाचणीवर आधारित आहे.
  • जर्मनीमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची प्रौढ लोकसंख्या कमी आहे. जर्मनीमध्ये कोविड -१९ पासून संक्रमित रूग्णांचे मध्यम वय ४७ आहे. याचा अर्थ असा आहे की जर्मनीने आपल्या वृद्ध लोकांना इतर कोणत्याही देशांप्रमाणे संक्रमित होऊ दिले नाही. ज्येष्ठांच्या बाहेर पडण्यावर जर्मनीने संपूर्ण बंदी घातली. म्हणूनच जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. यातून भारताने शिकण्याची गरज आहे.
  • जर्मनीमध्ये २६ जानेवारीला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर तातडीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना अलग ठेवण्यात आले होते. त्यानंतर देशातील ट्रेन, बस सर्व बंद करण्यात आले.
  • मृत्यू वय आणि सामान्य आरोग्यासारख्या घटकांवर देखील अवलंबून असते. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत कोणाची तपासणी केली जावी आणि कोणाची तपासणी होणार नाही यासंबंधी सर्व देशांचे वेगवेगळे निकष आहेत. केवळ अशाच लोकांची परीक्षा घेतली जात आहे ज्यांनी इतर देशांचा प्रवास केला आहे, परंतु जर्मनीमध्ये असे नाही.
  • जर्मनीची स्वत:ची विकेंद्रीकृत वैद्यकीय प्रणाली आहे जी केवळ अमेरिका किंवा भारतातच नव्हे तर इतर युरोपियन देशांमध्ये उपलब्ध नाही.
  • इम्पीरियल कॉलेज लंडनच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसांमध्ये मृत्यूचा धोका १० पट आहे, तर ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना धोका कमी आहे. हे एक प्रकारे आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर देखील अवलंबून असते. या प्रकरणात, सर्व वयोवृद्ध लोकांशी तरुणांचा संपर्क टाळण्यात जर्मनीने यश मिळवले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -