घरताज्या घडामोडीCorona: कोरोना व्हायरस कधीही पूर्णपणे संपुष्टात येणार नाही, WHOचा इशारा

Corona: कोरोना व्हायरस कधीही पूर्णपणे संपुष्टात येणार नाही, WHOचा इशारा

Subscribe

ओमिक्रॉन इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी गंभीर आहे. परंतु ओमिक्रॉनच्या धोक्याला कमी लेखू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

जगभरात कोरोनाने पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनासह ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज काही देशांमध्ये लाखोंनी नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटना वेगवेगळे इशारे देऊन चिंता आणखीनच वाढवत आहे. ज्याप्रकारे कोरोना विकसित होत आहे, त्यामुळे हा व्हायरस कधीही पूर्णपणे संपुष्टात येणार नाही, असा इशारा आता जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी दिला.

टास या वृत्तसंस्थेने सोलोव्हिएव्ह लाईव्ह युट्यूब चॅनेलवर रशियामधील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी मेलिता वुजनोविक हवाला देत म्हणाले की, ‘हा व्हायरस लोकसंख्येद्वारे स्थानिक रोग म्हणून प्रसारित होत राहिल. याच अर्थ असा आहे की, कोरोना व्हायरस कधीच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावर उपचार कसा केला पाहिजे आणि यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे शिकले पाहिजे.’

- Advertisement -

…तर कोरोना नवीन व्हेरिएंट विकसित होतील

पुढे मेलिता वुजनोविक म्हणाले की, ‘सध्या कोरोना व्हायरसला रोखणे आणि याचा शिकार होणाऱ्यांची संख्या कमी करण्याची गरज आहे. जर असे केले नाही तर नवनवीन व्हेरिएंट अनपेक्षित मार्गाने समोर येतील.’

ओमिक्रॉनला कमी लेखू नका

‘आतापर्यंत केलेल्या संशोधनात ओमिक्रॉन इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी गंभीर आहे, असे समोर आले आहे. परंतु ओमिक्रॉनच्या धोक्याला कमी लेखू नका. कोरोनाबाबतीतला हलगर्जीपणा सगळ्यांवर भारी पडू शकतो. सध्या लसीकरणशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आहे. त्यामुळे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. तसेच मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पालणे, गर्दीमध्ये जाणे टाळणे, याचे पालन केले पाहिजे,’ असे मेलिता वुजनोविक म्हणाल्या. 

- Advertisement -

हेही वाचा – Corona In India: दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ हजारांनी घट


 

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -