घरट्रेंडिंगcorona- कोमात असताना महिलेची प्रसुती; ६ दिवसांनंतर समजले मुलगी झाली!

corona- कोमात असताना महिलेची प्रसुती; ६ दिवसांनंतर समजले मुलगी झाली!

Subscribe

ही घटना अमेरिकेतील वॉशिंग्टनची असून २७ वर्षीय अँजेला प्रिमचेन्को या महिलेला गर्भावस्थेच्या ३३ व्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती

गर्भवती असताना महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली. यावेळी कोरोनाची लागण झालेल्या महिलेने कोमामध्ये असताना एका आपल्या मुलीला जन्म दिला. ही घटना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील असून २७ वर्षीय अँजेला प्रिमचेन्को या महिलेला गर्भावस्थेच्या ३३ व्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. अँजेला दुसऱ्या मुलाची आई होणार होती, या काळात तिची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. दरम्यान, या नवजात बाळाचा जन्म १ एप्रिल रोजी झाला. मात्र ६ एप्रिल रोजी अँजेला कोमातून बाहेर आली तेव्हा तिला सांगण्यात आले की, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

- Advertisement -

अँजेला हिला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या बाळाच्या जन्मानंतर साधारण १५ दिवसांनंतर बाळाला जवळ घेता आले. काही दिवसांनंतर कोरोनाची पुढील चाचणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आला, तेव्हाच डॉक्टरांनी आईला आपल्या मुलीला भेटण्याची परवानगी दिली.

मुलीला बघून अँजेला झाली भावूक

अँजेला २४ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर एका आठवड्यानी तिला वॉशिंग्टनमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या मुलीलाही जन्मानंतर आयसीयूमध्ये ठेवले होते. १५ एप्रिल रोजी अँजेलाला तिच्या मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. मुलीला पहिल्यांदा बघताना अँजेलाच्या डोळ्यात अश्रू येऊन ती भावूक झाली होती. सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असून तिची चर्चा होताना दिसतेय.


CoronaVrius: कधी सुधारणार? कोरोनाच्या हेल्पलाईनवर मागतायत पान-गुटखा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -