घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: न्यूयॉर्कमध्ये मृतदेहांचा खच, २४ तासात ७३१ जणांचा मृत्यू!

CoronaVirus: न्यूयॉर्कमध्ये मृतदेहांचा खच, २४ तासात ७३१ जणांचा मृत्यू!

Subscribe

कोरोना व्हायरसने अमेरिकेत धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून न्यूयॉर्क मध्ये एकाच दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेल्याचं समोर आलं आहे.

जगातील संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी संकटाशी लढत आहेत. आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसमुळे ८० हजारहून अधिक जण बळी गेले आहेत. एका दिवसात जगात सर्वाधिक कोरोनामुळे न्यूयॉर्कमध्ये बळी गेले आहे. न्यूयॉर्कमध्ये गेल्या २४ तासात ७३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क गव्हनर अॅड्र्यू क्योमो ने ही मंगळवारी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात मृतदेहाचा खच लागल्याचे दिसत आहे.

अॅड्र्यू क्योमो सांगितलं की, न्यूयॉर्कमध्ये गेल्या २४ तासात ७३१ लोकांनी कोरोना व्हायरसमुळे जीव गमावले आहेत. तसंच आतापर्यंत न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा ५ हजार ४८९वर पोहोचला आहे. यापूर्वी एकाच दिवसात सर्वाधिक ६३० लोक मरण पावले होते.

- Advertisement -

चीनमध्ये उद्यास आलेल्या कोरोना व्हायरस चीननंतर अमेरिकेत थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ स्पेन, इटली आणि जर्मनी आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले असून आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ८६ हजार १०४ आहे. यापैकी १२ हजार २४२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील निम्माहून अधिक लोक न्यूयॉर्कमध्ये मरण पावले आहेत.

जगभरातील आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १३ लाख ९८ हजार १६४वर पोहोचली आहे. यापैकी ८० हजार ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हजार ६६५ जण अजून गंभीर आहेत. तसंच २ लाख ९१ हजार ४३८ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: देशभरात कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या ५ हजाराच्या वर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -