घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटजगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर; ४ लाखाहून अधिक मृत्यू

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर; ४ लाखाहून अधिक मृत्यू

Subscribe

जगभरातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर गेला आहे. तर ४ लाख २० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगातील १८८ देशांवर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला झाला आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख २ हजार २७८ वर पोहोचला आहे. तर ४ लाख २१ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३५ लाख ३२ हजार ६९० जण बरे झाले आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख २३ हजार ३८५ वर पोहोचला आहे. तर १ लाख १३ हजार ८१८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ३८ हजार ६४५ जण बरे झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. न्यूयॉर्कमध्ये ३० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधी आज अमेरिकन तज्ज्ञांशी चर्चा करणार


अमेरिकेनंतर ब्राझीलला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २ हजार ८२८ वर पोहोचला आहे. तर ४० हजार ९१९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या यादीत रशिया तिसर्‍या क्रमांकावर आहे. रशियात ५ लाख १ हजार ८०० कोरोना संक्रमित आहेत. तर ६ हजार ५२२ जणांचा मृत्यू झाला आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये एकूण रुग्णांची संख्या २ लाख ९२ हजाराहून अधिक आहे आणि ४१ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी; ब्रिटन न्यायालयाचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -