जगभरातील कोरोनाबोधितांचा आकडा ७३ लाखांच्या पार; ४ लाखाहून अधिक मृत्यू

आतापर्यंत ३६ लाख ३ हजार ८९३ रुग्ण बरे झाले

Coronavirus

चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप सुरु आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ लाख २३ हजार ७६१ वर पोहोचला आहे. तर ४ लाख १३ हजार ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३६ लाख ३ हजार ८९३ रुग्ण बरे झाले आहेत. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख ४५ हजार ५४९ वर पोहोचला आहे. तर १ लाख १४ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७ लाख ८८ हजार ८६२ रुग्ण बरे झाले आहेत. दिवसाला सरासरी १५ हजाराच्या वर रुग्ण अमेरिकेत आढळत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण न्यू यॉर्क राज्यात आहेत. कोरोनाचा कहर सुरु असताना आनंदाची बातमी देखील आहे. नुकतंच न्यूझीलंडने कोरोनावर मात केली आहे. न्यूझीलंडसह टांझानिया, फिजी, व्हॅटिकन सिटी, मॉन्टेनेग्रो, सेशेल्स, सेंट किट्स आणि नेव्हिस, तैमोर लेस्टे, पापुआ न्यू गिनी या देशांनी देखील कोरोनावर विजय मिळवला आहे.


हेही वाचा – वाहनधारकांना दिलासा; नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ निर्णय


१. अमेरिका – २० लाख ४५ हजार ५४९

२. ब्राझिल – ७ लाख ४२ हजार ०८४

३. रशिया – ४ लाख ८५ हजार २५३

४. ब्रिटन – २ लाख ८९ हजार १४०

५. स्पेन – २ लाख ८९ हजार ०४६

६. भारत – २ लाख ७६ हजार १४६

७. इटली – २ लाख ३५ हजार ५६१

८. पेरु – २ लाख ३ हजार ७३६

९. जर्मनी – १ लाख ८६ हजार ५१६

१०. इराण – १ लाख ७५ हजार ९२७