घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: 'कोरोनानंतर दुसऱ्या एका महाभंयकर संकटाची चाहूल'

Coronavirus: ‘कोरोनानंतर दुसऱ्या एका महाभंयकर संकटाची चाहूल’

Subscribe

जगभरात सध्या कोरोना व्हायरस हा एकमात्र विषय कळीचा मुद्दा बनलेला आहे. इतिहासात पहिल्यांदा सर्व देश मिळून एकाच संकटामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच आता संयुक्त राष्ट्र संघाच्या WFP विभागाने आणखी एका महाभंयकर संकटाची चाहूल व्यक्त केली आहे. WFP म्हणजे वर्ल्ड फुड प्रोग्रामचे प्रमुख डेव्हिड बेस्ले यांनी या आपत्तीची माहिती दिली असून संपुर्ण विश्वाने या आपत्तीविरोधात एकत्र येण्याची हाक दिली आहे. कोरोनाच्या संकटानंतर जगातील १३ ते २५ कोटी जनता भुकबळीची शिकार होण्याची शक्यता बेस्ले यांनी व्यक्त केली आहे.

बेस्ले यांनी नुकताच संयुक्त राष्ट्र संघाचा चौथा वार्षिक जागतिक अन्न संकट अहवाल प्रकाशित केला. या अहवालात त्यांनी कांगो, येमेन, अफगाणिस्तान, व्हेनेझुएला, इथियोपिया, दक्षणि सुदान, सुदान, नायजेरिया आणि हैती या दहा देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. वातावरणातील बदल, आर्थिक मंदी अशा समस्यांनी हे दहा देश अडचणीच्या गर्तेत सापडतील, असे बेस्ले यांनी सांगितले.

- Advertisement -

या अहवालात काही धक्कादायक तथ्य मांडण्यात आली आहेत. मागच्यावर्षी दक्षिण सुदानमध्ये ६१ टक्के जनतेला अपुऱ्या अन्नाच्या संकटाचा सामना करावा लागला होता. तसेच कोरोनाचे संकट उभे राहण्याआधाी पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियामधील काही देशांना अन्नधान्याची कमतरता जाणवत होती. यामागे मागच्या दशकापासून सुरु असलेला दुष्काळ, कमी पर्जन्यमान अशी अनेक कारणे आहेत.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत एका व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बेस्ले यांनी जागाला “सुज्ञतेने वागा आणि वेगाने कृती करा” असा मंत्र दिला आहे. बेस्ले पुढे म्हणाले की, “पुढच्या काही काळात आपण दुष्काळसदृश्य परिस्थितीला तोंड देणार आहोत. आपल्याकडे वळ कामी आहे, हेच सत्य आहे. आपण सर्वांनी एकत्र येत भविष्यातील अडचणीचा सामना करण्यासाठी तयारी करायला हवी. कोरोना विषाणू हे कुपोषण आणि भुकबळीचे कारण ठरले नाही पाहीजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -