कोरोनासाठी झोमॅटोची आयडिया, ग्राहकांना कळणार डिलिव्हरी बॉयच्या शरीराचं तापमान!

त्यामुळे एखादी गोष्ट ऑर्डर करताना ग्राहकाला त्या अँपमध्ये दिसेल की फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे शरीरराचं तापमान किती आहे.

Zomato says 2 Biryanis delivered every second in 2021, over 1 crore people ordered Momos
Zomato Report : झोमॅटोवरुन वर्षात १ कोटीहून अधिकच्या Momos ऑर्डर केल्या पोहत, तर सेंकदाला २ बिर्याणी

दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या ७२ जणांना क्वारंटाईन केलं आहे. पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा हाऊज खास आणि मालवीय नगरमधील ७२ जणांना महाग पडला आहे. पण या सगळ्या प्रकरणाला लक्षात घेऊन फुड डिलीव्हरीची सर्विस देणाऱ्या झोमॅटोने एक नवीन फीचरची सुरूवात केली आहे.

त्यामुळे एखादी गोष्ट ऑर्डर करताना ग्राहकाला त्या अँपमध्ये दिसेल की फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे शरीरराचं तापमान किती असेल. या तापमानामुळे ग्राहकाला समजेल की फूड डिलीव्हरी करणारा मुलगा फिट आहे की नाही.

ट्वीटरवर एक ग्राहकाने लिहीले आहे की, झोमॅटोवरून फूड मागवल्यास एक आणखी एक बील दिलं जात आहे. त्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे शरीराचे तापमान लिहिले आहे.

चीनमध्ये काही दिवसांपूर्वी हा फिचर फूड डिलिव्हरी अप दिला जात होता. यात फूड डिलिव्हरी बॉयचे शरीराचे तापमान दिसत होते. सध्या तरी हे फीचर सगळ्यांसाठी उपलब्ध नाहीये. ज्या लोकांनी झोमँटोवरून फूड मागवले आहे, त्या सगळ्यांनाच डिलिव्हरी बॉयचे शरीराचे तापमान दिसत नाही. हळूहळू कंपनी यात वाढ करत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक ग्राहकाला या फिचरचा फायदा घेता येणार आहे.


हे ही वाचा – पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण; ७२ जण क्वारंटाईन