घरCORONA UPDATE'कोरोनिल' औषधावरून बाबा रामदेव यांच्यावर एफआयआर दाखल!

‘कोरोनिल’ औषधावरून बाबा रामदेव यांच्यावर एफआयआर दाखल!

Subscribe

मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाचे लाँचिंग केलं.

कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा करत ते औषध बाजारात आणणं बाबा रामदेव यांना चांगलच महागात पडलं आहे. आयुष मंत्रालयाच्या आक्षेपानंतर राजस्थान सरकारने गुन्हा नोंदवणार असल्याचं म्हणत या औषधावर बंदी घातली आहे. राजस्थान सरकारनंतर बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’ या औषधावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. तर आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाचे लाँचिंग केलं. ‘कोरोनिल’ आणि ‘श्वासारी’ या औषधामुळे रुग्णपुर्णपणे बरा होतो. याचा प्रयोग १०० रुग्णांवर करण्यात आला. ३ दिवसात ६९ टक्के पॉझिटिव्ह रूग्ण निगेटिव्ह झाले, अशी माहिती योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सर्व शंकांचं निरसन करण्यास पतंजली समर्थ असल्याचही त्यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच कोरोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले.

- Advertisement -

जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे.


हे ही वाचा – ‘हा’ SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकामं! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -