घरताज्या घडामोडीपंजाबमध्ये आढळला पहिला करोना रुग्ण; कर्नाटकातही एक पॉझिटिव्ह

पंजाबमध्ये आढळला पहिला करोना रुग्ण; कर्नाटकातही एक पॉझिटिव्ह

Subscribe

भारतातील करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. तर पंजाब राज्यात पहिला करोना रुग्ण आढळला आहे. आज कर्नाटकातही एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जगभरात एक लाखाहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली असून हजारो नागरिकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत.

पंजाबमध्ये आढळलेला रुग्ण नुकताच इटलीहून परतला होता. अमृतसर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून इटलीच्या मिलान येथून हा नागरिक दिल्लीहून अमृतसर विमानतळावर ४ मार्च रोजी उतरला होता. पंजाबच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या इसमासोबत आणखी दोन कुटुंबिय देखील होते. तसेच या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

करोनाची लागण झालेला रुग्ण होशियारपूर येथील रहिवासी आहे. अमृतसर विमानतळावर तपासणी झाल्यानंतर तो करोना बाधित असल्याचे समजले. त्यानंतर त्याला अमृतसरच्या सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत करोनासदृश्य लक्षणे दिसल्यानंतर पुण्यातील प्रयोगशाळेत या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यानंतर आज या व्यक्तिला करोना असल्याचे पुण्यातील प्रयोगशाळेने सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच कर्नाटकातही एक रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतून दुबईमार्गे आलेल्या या रुग्णाला करोना असल्याचे सिद्ध झाल्यानंतर बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा व्यक्ती १ मार्चला अमेरिकेतून कुटुंबियांसहीत परतला होता. या कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या इतर व्यक्तिनांही वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -