ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण

या व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉनचे काही म्यूटेशनही आढळले आहेत. सायप्रसचे आरोग्य मंत्री मिखालिस हदीपेंटेलस म्हणाले की, सध्या नव्या व्हेरिएंटबाबत काळजी करण्याची गरज नाही.

corornavirus new variant deltacron, what is deltacron
ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण

कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे जगाची झोप उडाली आहे. यातच जग कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमधून सावरल्यानंतर  ओमिक्रॉनचा धोका वाढतोय. अशातच सायप्रसच्या एका शास्त्रज्ञाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे मिश्रण असल्याचे सांगितले जात आहे. त्याला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे.

ओमिक्रॉन हा आत्तापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचे म्हटले जातेय. तर डेल्टाने गेल्या वर्षी अनेक देशांमध्ये कहर केला होता. अशा परिस्थितीत या दोन्ही व्हेरिएंटमुळे तयार झालेला नवा व्हेरिएंट किती धोकादायक ठरु शकतो, याचे अंदाज बांधले जात आहेत.

सायप्रसच्या संशोधकांनी या आठवड्यात या व्हेरिएंटसंदर्भात निष्कर्ष GISAID ला पाठवले आहेत. व्हेरिएंटला ट्रॅक करणारा GISAID हा आंतरराष्ट्रीय डेटाबेस आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रसला आतापर्यंत डेल्टाक्रॉनची 25 रुग्ण सापडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही देशाने याला दुजोरा दिलेला नाही.

सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्यूलर व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लियोनडिओस कोस्त्रिकिस म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्यूटेशनची फ्रीक्वेंसी जास्त होती, हे नवे व्हेरिएंट आणि रुग्णालयात दाखल होण्याचे संबंध दर्शवितात.

हा व्हेरिएंट डेल्डा किती वेगळा आहे?

या नवीन व्हेरिएंटची जेनेटिक पार्श्वभूमी डेल्टासारखीच आहे, यावरही त्यांनी भर दिला. यासोबतच या व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉनचे काही म्यूटेशनही आढळले आहेत. सायप्रसचे आरोग्य मंत्री मिखालिस हदीपेंटेलस म्हणाले की, सध्या नव्या व्हेरिएंटबाबत काळजी करण्याची गरज नाही.

डेल्टाक्रॉनवर काम करणाऱ्या काही विषाणूशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाचा हा काही नवीन व्हेरिएंट नाही, हा व्हेरिएंट फाइयलोजेनेटिक ट्रीवर ट्रेस किंवा प्लॉट केला जाऊ शकत नाही.

भारतात झपाट्याने वाढणारी कोरोनाची प्रकरणे सध्या भारतासह संपूर्ण जग कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटशी झुंज देत आहे. रविवारी भारतात कोरोनाचे 1,59,632 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत कोरोनाचे २ लाखांहून अधिक रुग्ण आढळू शकतात.