घरदेश-विदेशKarnataka Elections : भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हेच काँग्रेसचे ध्येय, पंतप्रधान मोदींची टीका

Karnataka Elections : भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हेच काँग्रेसचे ध्येय, पंतप्रधान मोदींची टीका

Subscribe

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections 2023) प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी रोड शो केला. तसेच शिवमोग्गा येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण हेच ज्या पक्षाचे ध्येय आहे, ती काँग्रेस कर्नाटकचा विकास करू शकेल का? 85 टक्के कमिशन खाणारी काँग्रेस कर्नाटकातील तरुणांचे भविष्य घडवू शकते का? असे सवाल त्यांनी केले.

काँग्रेसने येत्या पाच वर्षांत खासगी क्षेत्रात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच, दरवर्षी दोन लाख नोकऱ्या! भाजपा सरकारने कर्नाटकात साडेतीन वर्षे राज्य केले आणि दरवर्षी 13 लाखांहून अधिक औपचारिक नोकऱ्या निर्माण केल्या. याचा अर्थ, काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटकला रिव्हर्स गियरमध्ये टाकेल. जनतेने काँग्रेस पक्षाबाबत सावध राहावे, असे आवाहनही मोदींनी केले.

- Advertisement -

आपली प्राचीन संस्कृती आणि वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम भाजप सरकार प्रामाणिकपणे करत आहे, मात्र काँग्रेसच्या सरकारने यातही तुष्टीकरणाचे; राजकारण केले. काँग्रेसने एकतर आमच्या श्रद्धा आणि अध्यात्माची जी प्रतिके होती ती एकतर दयनीय अवस्थेत ठेवली किंवा, ती वादाच्या भोवऱ्यात ठेवली, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत

- Advertisement -

महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
काँग्रेसच्या काही दशकांच्या राजवटीत मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाकडे दुर्लक्षित केले गेले. भाजपने मुलींवरील अन्याय दूर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आज अधिकाधिक मुली शाळेत जात आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमध्ये 8 किमीचा रोड शो केला. रोड शो दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती. पंतप्रधानांनीही त्यांच्या अभिवादनाला हस्तांदोलन करून उत्तर दिले. हा रोड शो सुमारे दीड तास चालला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -