घरदेश-विदेशभ्रष्टाचार भोवला, पोलीस उपअधीक्षकाची थेट निरीक्षकपदी पदावनती; योगींची थेट कारवाई

भ्रष्टाचार भोवला, पोलीस उपअधीक्षकाची थेट निरीक्षकपदी पदावनती; योगींची थेट कारवाई

Subscribe

रामपूरमध्ये तैनात असलेल्या पोलीस उपअधिक्षक विद्या किशोर शर्मा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना त्यांच्या मूळ पदावर पदावनती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रामपूर – भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश बनवण्याकरता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी कंबर कसली आहे. याचाच प्रत्यय एका महिला पोलीस उपअधिक्षकाला (Superintendent of Police) आला आहे. भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित पोलीस उपअधीक्षक दोषी ठरल्याने त्याला पोलीस उपअधीक्षपदापासून पदावनती करत पोलीस निरिक्षक करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा राहुल गांधींच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात हवे; मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान

- Advertisement -

रामपूरमध्ये तैनात असलेल्या पोलीस उपअधिक्षक विद्या किशोर शर्मा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्यांना त्यांच्या मूळ पदावर पदावनती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रामपूर येथे तैनात असलेल्या पोलीस अधिक्षक विद्या किशोर शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. लाच घेताना त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची चौकशी डीआयजी यांनी केली होती. प्राथमिक चौकशीत हे आरोप सिद्ध झाल्याने विद्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनाग्रस्त भागाची केली पाहणी; पीडितांना हवी ती मदत करण्याचे दिले निर्देश

आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यता आलं होतं. त्यानंतर, विभागीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. मंगळवारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, संबंधित पोलीस उपअधिक्षकाची पदावनती करण्यात आली असून त्यांना पोलीस निरिक्षक करण्यात आलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -