घरदेश-विदेश६६ बालकांचा जीव घेणारे ते कफ सिरप भारतात विकले जात नाही, सरकारकडून...

६६ बालकांचा जीव घेणारे ते कफ सिरप भारतात विकले जात नाही, सरकारकडून स्पष्टीकरण

Subscribe

मेथोजिन ओरल सोल्यूशन, मॅग्रीप एन कोल्ड सिरप, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप आणि मकॉफ बेबी कफ सिरप या चार प्रकारच्या कफ सिरपमुळे गॅम्बियामध्ये ६६ बालकांचा मृत्यू झाल्याचा आक्षेप जागतिक आरोग्य संघटेनेने नोंदवला आहे. या औषधांमध्ये आरोग्याला घातक पदार्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या कफ सिरपच्या चौकशीचे आदेस दिले होते.  

नवी दिल्ली – भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे गॅम्बिया येथे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मात्र हे कफ सिरप भारतीय कंपनी मेडेन फार्मा बनवत असली तरी त्याची विक्री भारतात होत नाही. मेडेन फार्माकडून या औषधाची गॅम्बियामध्ये निर्यात केली जाते, असं स्पष्टीकरण भारतीय औषध नियंत्रक मंडळाने दिलं आहे.

हेही वाचा -भारतीय कफ सिरपमुळे गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू; डब्ल्यूएचओकडून चौकशी सुरू

- Advertisement -

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या 4 कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. सध्या डब्लूएचओकडून कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मेडेन फार्मा या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या चार प्रकारच्या सिरपची निर्मिती जरी भारतात होत असली तरी त्याची विक्री मात्र देशात केली जात नसल्याचं ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष राजीव सिंघल यांनी म्हटलं आहे.

मेथोजिन ओरल सोल्यूशन, मॅग्रीप एन कोल्ड सिरप, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप आणि मकॉफ बेबी कफ सिरप या चार प्रकारच्या कफ सिरपमुळे गॅम्बियामध्ये ६६ बालकांचा मृत्यू झाल्याचा आक्षेप जागतिक आरोग्य संघटेनेने नोंदवला आहे. या औषधांमध्ये आरोग्याला घातक पदार्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या कफ सिरपच्या चौकशीचे आदेस दिले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -