घरताज्या घडामोडीदेशातील ५ अनोखे रेल्वे स्टेशन, कुठे लागतो व्हिसा तर कुठे तिकीटासाठी शेकडो...

देशातील ५ अनोखे रेल्वे स्टेशन, कुठे लागतो व्हिसा तर कुठे तिकीटासाठी शेकडो मैल रांगा

Subscribe

भारत हा निसर्ग सौंदर्यासाठी जसा प्रसिद्ध आहे. तसाच तो त्याच्या विविधतेसाठीही प्रसिद्ध आहे. मग ही विविधता राज्य आणि भाषा,पेहरावा बरोबरच खानपाणाच्या संस्कृतीतही आढळते. पण आज आम्ही तुम्हांला देशातील अशा काही आगळ्या वेगळ्या रेल्वे स्टेशनबदद्ल सांगणार आहोत जिथं सगळचं आगळंवेगळं आहे. येथे जाण्यासाठी तिकीट नाही तर चक्क व्हिसा लागतो. तर असेही स्टेशन आहे जिथे तिकीटासाठी एवढी लांबलचक रांग लागते. तर काही स्टेशनला नावच नाहीत.

भवानीमंडी रेल्वे स्टेशन

- Advertisement -

दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावरील भवानी मंडी रेल्वे स्टेशन हे एक नाही तर दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. हे स्टेशन राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. या स्टेशनवर ठेवण्यात आलेल्या बाकड्यांवरील एका भागावर राजस्थान लिहले आहे तर दुसऱ्या भागावर मध्यप्रदेश. एवढेच नाही तर या स्टेशनचं बुकींग काऊंटर मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यात आहे तर स्टेशनचे प्रवेशद्वार आणि वेटींग रुम राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यामध्ये.

अटारी रेल्वे स्टेशन
अटारी रेल्वे स्टेशन भारत पकिस्तानच्या सीमेवर आहे. हे स्टेशन देशातील असं एकमेव रेल्वे स्टेशन आहे जिथे भारतीय नागरिकांना जाण्यासाठी व्हिसा लागतो. येथे नेहमी सुरक्षा रक्षक तैनात असतात. जर येथे व्हिसाशिवाय तुम्ही पकडले गेलात तर तुमच्याकडून दंड नाही तर थेट शिक्षा ठोठावली जाते.  गुन्हा दाखल होतो. ज्यात जामीन मिळवणे कठीण असते.

- Advertisement -

झारखंडचे बेनाम रेल्वे स्टेशन

झारखंडची राजधानी रांची येथून टोरीला जाणारी रेल्वेही एका निनावी स्टेशनवरून जाते. या स्टेशनला नावच नाहीये. २०११ मध्ये पहील्यांदाच या स्टेशनला बडकीचांपी नाव देण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र कमले गावातील नागरिकांनी यास विरोध केला. त्यानंतर या स्टेशनला नाव कधी देण्यात आलंच नाही.

नवापुर रेल्वे स्टेशन
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात नवापुर नावाचं एक आगळ वेगळं रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन दोन राज्यात विभागले जाते. एक स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये तर अर्धा भाग महाराष्ट्रात. यामुळे स्टेशनवर ठेवण्यात आलेल्या बाकड्यांवर मराठी आणि गुजरातीमध्ये लिहलेले आहे. येथे मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलली जाते.

बेनाम रेल्वे स्टेशन
पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातही एक रेल्वे स्टेशन आहे. ज्याला नावच नाहीये. वर्धमान जिल्हयापासून ३५ किलोमीटर दूर बांकुरा-मैसग्राम रेल्वे मार्गावर हे स्टेशन आहे. २००८ साली या स्टेशनची स्थापना करण्यात आली. त्यावेळी त्याला रैनागढ असं नाव देण्यात आलं. पण रैना गावातील गावकऱ्यांनी यास विरोध केला. रेल्वे बोर्डाकडे याबद्दल तक्रार केली. पण त्यावर आतापर्यंत रेल्वेने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे या रेल्वेस्टेशनला नावच नाहीये. य़ेथे तिकीटासाठी शेकडोमैल  लांबलचक रांगा लागतात.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -