घरदेश-विदेशस्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात देशाला नवीन संसद मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात देशाला नवीन संसद मिळाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

मोदींच्या हस्ते लोकसभेमध्ये पवित्र अशा सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या नव्या संसद भवनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देसाला नवीन संसद मिळाली, असे मत यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केले. तर या संसद भवनाच्या कामामुळे 60 हजार कामगारांना रोजगार मिळाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आज (ता. 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशातील लोकशाहीचे मंदिर म्हंटल्या जाणाऱ्या नव्या संसद भवनाच्या  इमारतीचे म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम दोन टप्प्यात पार पडला. पहिल्या टप्प्यामध्ये पुजा आणि सर्वधर्मियांची प्रार्थना झाली. त्यावेळी मोदींच्या हस्ते लोकसभेमध्ये पवित्र अशा सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या नव्या संसद भवनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देसाला नवीन संसद मिळाली, असे मत यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केले. तर या संसद भवनाच्या कामामुळे 60 हजार कामगारांना रोजगार मिळाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी; नवीन संसद उद्घाटन सोहळ्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात. आज तो क्षण आहे. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. याच काळात आपल्याला आपली नवी संसद मिळाली आहे.

भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. आज सकाळी संसद भवन परिसरात सर्व पंथांच्या प्रार्थना झाल्या आहे. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारं मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारी कडी सिद्ध होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना सांगितले.

- Advertisement -

तर, नवीन संसद भवन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संकल्पना साकार करत आहे. ही नवी संसद आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाची साक्षीदार होईल. विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना पाहील. नूतन आणि पुरातनाच्या सहअस्तित्वाचा आदर्श बनेल. भारत जेव्हा विकास करतो, पुढे जातो, तेव्हा हे विश्वदेखील पुढे सरकत, असे मोदींकडून यावेळी सांगण्यात आले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संसद भवनाने सुमारे ६०,००० कामगारांना रोजगार दिला आहे. त्यांच्या श्रमाला समर्पित डिजिटल गॅलरीही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी पंतप्रधानांकडून देण्यात आली. आपण लोकसभा आणि राज्यसभा पाहून आनंद साजरा करत आहोत, परंतु आपण देशात 30 हजारपेक्षा अधिक नवीन पंचायत इमारती देखील बांधल्या आहेत. पंचायत भवन ते संसद भवनापर्यंत आमची निष्ठा सारखीच आहे, असेही ते संबोधित करताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -